महाबळेश्वरचा विकास आणि आपत्कालीन सज्जतेला गती द्या

दर्जेदार व वेळेत कामे पूर्ण करण्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. मकरंद पाटील यांच्या सूचना 

Review meeting on development works and emergency preparedness, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वर शहराच्या पायाभूत सुविधा भक्कम करण्यासोबतच पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या विविध विकास कामांना गती देण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय मकरंद  पाटील यांनी दिले आहेत. शुक्रवार दि. १७ जुलै २०२६ रोजी महाबळेश्वर येथील 'हिरडा वन विश्रामगृह' येथे आयोजित करण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या व आपत्कालीन सज्जतेच्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीत प्रामुख्याने महाबळेश्वरची मुख्य बाजारपेठ असलेल्या 'साबणे रोड' येथील सुशोभीकरणाच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. हे सुशोभीकरणाचे काम अत्यंत दर्जेदार आणि ठरवून दिलेल्या वेळेतच पूर्ण करण्याच्या दृष्टीने ना. मकरंद पाटील यांनी संबंधित यंत्रणेला महत्त्वपूर्ण आणि कडक सूचना दिल्या. तसेच महाबळेश्वर शहरात चालू असलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा व आपत्कालीन व्यवस्थापनाचा सखोल आढावा घेतला.

 प्रामुख्याने तापोळा रोड, एल. सी. डिसुजा रोड आणि क्षेत्र महाबळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या कामांबाबत आढावा घेण्यात आला. हे रस्ते पर्यटनाच्या व स्थानिक नागरिकांच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याने, पावसाचा अंदाज घेऊन या रस्त्यांची कामे प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश मकरंद पाटील यांनी दिले. या बैठकीत वन विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या जागा, विकास कामांमधील तांत्रिक अडचणी आणि पर्यावरण समतोल राखून करावयाची कामे यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवत सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. नगरपरिषद व वन विभागाने आपसात समन्वय राखून स्थानिक नागरिक व पर्यटकांची होणारी गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने काम करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

तसेच दिनांक 5 जुलै व 6 जुलै रोजी अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव शासनाकडे सादर करणेच्या सूचना दिल्या.

 बैठकीच्या सुरुवातीला महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी सुरू असलेल्या व नियोजित विकासकामांचे सविस्तर सादरीकरण (Presentation) केले.

तसेच मुख्य बाजारपेठ डॉ. साबणे रोड व परिसर सुशोभीकरण कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडील अभियंता               शिवप्रसाद धुमाळ यांनी सादरीकरण केले.

या आढावा बैठकीस नगराध्यक्ष  सुनील शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, पंचायत समिती माजी सभापती संजय गायकवाड, स्वच्छता सभापती संजय जंगम, बांधकाम सभापती अफझल सुतार, शिक्षण सभापती रोहित ढेबे, महिला व बालकल्याण सभापती संगीता वाडकर,  वनपरीक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते, वनपाल सुनिल लांडगे तसेच नगरसेवक संतोष आखाडे,नगरसेविका विमलताई पार्टे,विद्या बावळेकर, पल्लवी  कोंढाळकर, प्रियंका वायदंडे, रेश्मा ढेबे, स्मिता पाटील,  अर्बन बँकेचे संचालक शरद बावळेकर व अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय वाडकर,यांच्यासह सर्व कामांचे मक्तेदार ,प्रकल्प सल्लागार व महाबळेश्वर नगरपरिषदेचे सर्व विभागप्रमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD), वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस स्टेशन महाबळेश्वरचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

"महाबळेश्वर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अग्रगण्य पर्यटन स्थळ असून, येथील पायाभूत सुविधा अत्यंत भक्कम व दर्जेदार करणे हे आपले मुख्य उद्दिष्ट आहे. साबणे रोडचे सुशोभीकरण आणि अंतर्गत रस्त्यांची कामे उच्च दर्जाची असावीत, जेणेकरून येथे येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना कोणत्याही त्रासालासामोरे जावे लागणार नाही. कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही."

— मा. मकरंद  पाटील (मदत व पुनर्वसन मंत्री)

"माननीय मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर नगरपरिषद शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी कटिबद्ध आहे. साबणे रोडच्या सुशोभीकरणासह अंतर्गत रस्ते दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करून घेणेसाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत. तसेच, वन विभाग आणि इतर शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना सर्वोत्तम सुविधा देण्याला आमचे प्राधान्य राहील."

—  सुनील शिंदे (नगराध्यक्ष, महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद)

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !