सुरक्षित वारी, स्मार्ट वारी च्या संदर्भाने जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांची पोलीस मुख्यालयात परेड

या ट्रेकमध्ये एकूण 81 हिस्ट्री सीटर्स, गॅंग हिस्ट्रीसिटर्स, क्रिमिनल गुंडा व गुन्हे दाखल असलेले आरोपी हजर होते.

Parade of criminals at police headquarters, Solapur, Pandharpur, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर प्रतिनिधी 

आगामी काही दिवसांमध्ये श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारी सोहळा पार पडत असून हा वारी सोहळा "स्मार्ट वारी, सुरक्षित वारी" या संकल्पनेतून पार पाडण्यासाठी माननीय श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी संकल्प केला आहे याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 6 जुलै विशेष 26 रोजी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील हिस्ट्री सीटर, गॅंग हिस्ट्री सीटर, क्रिमिनल गुंडा व गुन्हे दाखल असलेले आरोपी यांना पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे बोलावून घेऊन पोलीस अधीक्षकांनी आगामी सण उत्सव कालावधीत कोणताही कृती करून सामाजिक सुव्यवस्था भंग न करण्याबाबत सूचित केले आहे.  यावेळी जिल्ह्यातून एकूण 81 हिस्ट्री सीटर्स, गॅंग हिस्ट्रीसिटर्स, क्रिमिनल गुंडा व गुन्हे दाखल असलेले आरोपी हजर होते.

तसेच या सराईत गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांची पात्रता व इच्छा पाहून योग्य रोजगार देणार असल्याबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे ज्या गुन्हेगारांकडे  शेती आहे त्यांना शेती विषयक योग्य व मोफत सल्ला मार्गदर्शन देण्याबाबत आश्वासित केले आहे. 

या गुन्हेगारांकडून आगामी काळात शांतता राखण्याबाबत चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र लिहून घेण्यात आले असून त्यांच्यावर पोलिसांचा वॉच राहणार आहे. या हमीपत्राचा कोणी भंग केल्यास त्यांच्यावर कडक  कायदेशीर कार्यवाही करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी  यांनी दिले आहेत.

        -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !