राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2026 प्रदान

संस्थाध्यक्ष नाना मालक कवठेकर व शिक्षक वृंदांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Ideal Teacher Award, Mr. Kshitij Dhananjay Moholkar Sir, Solapur, Pandharpur, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर प्रतिनिधी

येथील पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूलमधील शिक्षक श्री. क्षितिज धनंजय मोहोळकर सर यांना ज्ञानदीप संस्था, नाशिक यांच्या वतीने या वर्षाचे अत्यंत मानाचे ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ आणि ‘इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२६’ जाहीर झाले आहेत. या दुहेरी बहुमानाबद्दल आज दिनांक १८ जुलै २०२६ रोजी प्रशालेमध्ये त्यांचा भव्य सत्कार व गौरव करण्यात आला.

पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय सेक्रेटरी श्री. सुधीर पटवर्धन सर आणि पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. मोहोळकर मॅडम यांच्या शुभहस्ते श्री. क्षितिज मोहोळकर सर यांना शाल व श्रीफळ देऊन संस्था व प्रशालेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

शिक्षकी पेशात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नाशिकच्या ज्ञानदीप संस्थेने मोहोळकर सरांना या पुरस्कारांनी गौरवले आहे. त्यांच्या या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशामुळे पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. नाना मालक कवठेकर सर, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच उपस्थित सर्व शिक्षकांनी मोहोळकर सरांचे मनापासून अभिनंदन केले.

प्रशालेतील एका सहकाऱ्याला मिळालेल्या या मोठ्या पुरस्कारामुळे पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूलच्या संपूर्ण शिक्षक वृंदांमध्ये आणि कर्मचारी वर्गात प्रचंड उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व स्तरांतून मोहोळकर सरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

     -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !