पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वारकरी दिंडी व वृक्षदिंडी उत्साहात साजरी

 दिंडीमध्ये जवळजवळ 300 विद्यार्थीच्या सहभाग  

Celebration of Warkari and Tree Dindi, Solapur , Pandharpur, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर प्रतिनिधी 

पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आज दिनांक 18/07/2026 शनिवार रोजी प्रशालेमध्ये जवळजवळ तीनशे विद्यार्थ्यांसह वारकरी दिंडी व वृक्षदिंडी उत्साहात साजरी करण्यात आली आजच्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्री सुधीर पटवर्धन सर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता मोहोळकर तसेच कमिटी मेंबर्स सौ अपर्णा सुतार व सौ पल्लवी जाधव यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींचे तसेच पालखीचे पूजन करण्यात आले. आजच्या या दिंडीमध्ये जवळजवळ 300 मुलांनी सहभाग घेतला होता काही विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य,विठ्ठलाच्या गाण्यांवर नृत्य सादर केले इयत्ता नर्सरी पासून बाल चिमुकले कोणी पांडुरंग, कोणी  रुक्मिणी, कोणी मुक्ताई व वारकऱ्यांच्या वेशभूषेत आले होते. पांडुरंग रुक्मिणीची पालखी घेऊन ढोल ताशांच्या गजरात दिंडी पंढरपूर परिसरातून  ज्ञानोबा तुकाराम यांच्या गजरात पंढरपूर परिसरातून रस्त्याने अगदी आनंदाने उत्साहात फिरून आली . 

तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी 'एक पेड मॉं के नाम' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी वृक्ष घेतले होते. छोट्या वारकऱ्यांनी रिंगण सादर केले. याप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी माननीय श्री सुधीर पटवर्धन सर तसेच पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका  सौ. मोहोळकर यांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यासाठी प्रशालेच्या सर्व शिक्षकांनी खूप परिश्रम घेतले त्यामध्ये सौ काळे,सौ जगताप, सौ जाधव, सौ पोरे, सौ शिंदे, सौ दुरुगकर, सौ चोबे, सौ हुच्चे, सौ वीरकर, सौ शहा, क्षितिज मोहोळकर, पृथ्वीराज पाटील, निखिल घोडके, प्रवीण उत्पात इत्यादी होते.

    -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !