आषाढी वारीत वारकरी बांधवांसाठी वरद श्रीशा सोशल फाउंडेशनची निस्वार्थ आरोग्यसेवा; सेवाभावाचा आदर्श

आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिराचे आयोजन

Health Check-up Camp, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

आषाढी वारीच्या पावन आणि मंगलमय वातावरणात "सेवा हीच खरी ईश्वरभक्ती" या उदात्त भावनेचा प्रत्यय देत वरद श्रीशा सोशल फाउंडेशन, ता. वाई, जि. सातारा यांच्या वतीने दि. १७ जुलै २०२६ रोजी फलटण येथे वारकरी बांधवांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. पंढरीच्या वाटेवर विठ्ठलनामाचा गजर करत चालणाऱ्या वारकरी बांधवांना प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांवर तत्काळ उपचार मिळावेत, या सेवाभावी उद्देशाने हे शिबिर राबविण्यात आले. शेकडो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक ती औषधे मोफत देण्यात आली. या उपक्रमामुळे अनेक वारकरी बांधवांना दिलासा मिळाला.

या सेवाकार्यात वरद हॉस्पिटल अँड आयसीयू सेंटरचे डॉ. शैलेंद्र धेडे, डॉ. विशाल मांढरे, डॉ. कृपाली धेडे, सौ. सुनीता कुंभार (स्टाफ नर्स),  विशाल पोळ (ब्रदर) तसेच  श्रीधर यादव (ॲम्ब्युलन्स चालक) यांनी अत्यंत सेवाभावाने सहभाग घेत वारकरी बांधवांना आरोग्यसेवा प्रदान केली. त्यांच्या समर्पित कार्याबद्दल वारकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

आषाढी वारी ही केवळ श्रद्धेची नव्हे तर मानवतेचीही परंपरा आहे. अशा पवित्र सेवाकार्यातून वरद श्रीशा सोशल फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत विठ्ठल भक्तांच्या सेवेत मोलाचे योगदान दिले. समाजासाठी अशा सेवाभावी उपक्रमांची प्रेरणा कायम राहावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

     -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !