वेण्णा नदीवरील पूल तुटला, पर्यटक अडकले.
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
महाबळेश्वरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वेण्णा लेक परिसरातील वेण्णा नदीवरील एक छोटा पूल तुटल्याची घटना घडली आहे. पूल तुटल्यामुळे रस्त्याच्या पलीकडील बाजूस अनेक पर्यटक अडकून पडले आहेत.
अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. तसेच पर्यटकांच्या वाहनांना क्रेनच्या सहाय्याने नदीच्या दुसऱ्या बाजूला सुरक्षितरीत्या हलविण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरातील अनेक घरांना पाण्याचा वेढा पडला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून आवश्यक ती मदत व खबरदारीची उपाययोजना करण्यात येत आहे.
महाबळेश्वरमध्ये रविवारी अवघ्या एका दिवसात तब्बल ५१३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, या विक्रमी पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, रस्ते बाधित होणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याच्या घटना घडत आहेत. नागरिक आणि पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



