पंचायत समिती सदस्य स्वप्निल गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश- दोन लाखांचा निधी
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
व्याहळी कॉलनी येथील प्राथमिक शाळा व श्री काळभैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रियाताई शिंदे यांच्या हस्ते रविवारी उत्साहात झाले. पंचायत समिती सदस्य स्वप्निल गायकवाड यांच्या प्रयत्नातून हे काम मंजूर झाले असून, त्यासाठी सुमारे दोन लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर, दीप्तीताई पिसाळ, विराज शिंदे तसेच पंचायत समिती सदस्य स्वप्निल गायकवाड उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. प्रियाताई शिंदे म्हणाल्या, “पश्चिम भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहणार असून, नागरिकांच्या मूलभूत गरजा तसेच आवश्यक विकासकामांना प्राधान्य दिले जाईल.”
पेव्हर ब्लॉक बसविल्यामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसह श्री काळभैरवनाथ मंदिरात येणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे. तसेच शाळा व मंदिर परिसराचे सुशोभीकरण होऊन परिसर अधिक स्वच्छ व सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमास व्याहळीच्या सरपंच सुजाता कांबळे, उपसरपंच सविता थोरवे, शोभा थोरवे, ज्योती वाडकर, मनीषा कीर्तने, माजी सरपंच रघुनाथ थोरवे, विजय थोरवे, किसन थोरवे, अरविंद थोरवे, विश्वास थोरवे, दिगंबर थोरवे, संजय थोरवे, सुजय थोरवे, संतोष थोरवे (फौजी), किसन देशमुख, संतोष गायकवाड, विनायक गहीने, सचिन मानकुंबरे, अजित वाडकर, संतोष पिसाळ, विक्रम कांबळे, विनायक थोरवे, सागर घाडगे, हणमंत पवार, विनोद शेलार, गणेश पिसाळ, सचिन पिसाळ, सुधीर पिसाळ, तुषार कांबळे, शाम जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशांत थोरवे यांनी मानले.
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा















