आदर्श माता म्हणून आनंदीबाई शिंगारे यांचा विशेष सन्मान
शिवशाही वृत्तसेवा सातारा, (प्रतिनिधी शुभम कोदे)
सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, क्रीडा, पत्रकारिता आणि उद्योजकता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, यावर्षी सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे यांना आदर्श माता म्हणून विशेष सन्मानाने गौरविण्यात येणार आहे.
फाउंडेशनचे अध्यक्ष संजय सावंत यांनी पुरस्कारांची घोषणा केली. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांचे हे नववे वर्ष आहे. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारांद्वारे सन्मानित केले जाते.
पुरस्कार वितरण सोहळा १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वा. नवी मुंबई स्पोर्ट क्लब, वाशी, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
यंदाच्या पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रातील निशिगंधा कापडणीस, माधवी सूर्यवंशी, अर्चना सदरे, नारायण म्हात्रे, मेघा शिंपी, संध्या माने, रमेश पाटील, आदित्य मोरे आणि शरद निकम यांची निवड झाली आहे. उद्योजकता क्षेत्रात अनिकेत पोखरकर, नितीन भोसले, दीपक कोकाटे, संजय पाटील, रुपेश कोलते, ओमकार शिंदे आणि सचिन पवार यांना गौरविण्यात येणार आहे. क्रीडा क्षेत्रातील नमिता पाटील व राहुल पाटील, वैद्यकीय सेवेसाठी विशाल पाटील, शिक्षण क्षेत्रातील भरत ढेरे, कला क्षेत्रातील नम्रता पाटील व शुभ्रा भोसले, साहित्य क्षेत्रातील डॉ. सुनिता चव्हाण, सचिन अवघडे, बाळकृष्ण पाटील, संजय नायकवडी व पुनम खंडागळे तसेच पत्रकारिता क्षेत्रातील बबलू पेशकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
विशेष बाब म्हणजे, यशस्वी उद्योजक घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे यांना आदर्श माता विशेष सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नवनिर्वाचित झालेल्या लोकप्रतिनिधींचाही यावेळी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या पुरस्कार सोहळ्यामुळे विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणवंतांना प्रेरणा मिळणार असून, राज्यभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा दिमाखात पार पडणार आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



