निसर्ग संवर्धन ही भावी पिढीसाठी अमूल्य गुंतवणूक - विवेक कुलकर्णी

गरवारे टेकनिकल फायबर्समध्ये 'जागतिक पर्यावरण दिन' उत्साहात; १०० वृक्षांची लागवड

World environment Day, garware technical fibres, Vivek Kulkarni, Wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

पर्यावरण संरक्षण ही केवळ एक सामाजिक जबाबदारी नसून ती आपल्या भावी पिढ्यांसाठीची अमूल्य गुंतवणूक आहे, अशी जाणीव करून देत गरवारे टेकनिकल फायबर्स (वाई) येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाने कर्मचाऱ्यांमध्ये एक नवे नवचैतन्य निर्माण केले.

कार्यक्रमाचा शुभारंभ कंपनीचे प्रेसिडेंट विवेक कुलकर्णी, मुख्य मानव संसाधन अधिकारी पूनम गुप्ता आणि वरिष्ठ अधिकारी प्रबोध कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जनरल मॅनेजर युवराज थोरात, असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट विवेक देशपांडे, सचिन कुलकर्णी, महेंद्र रुद्ररूपु, दिनेश अग्रवाल, गिरीश खेर्डेकर, डी. पी. सिंग, ए. व्ही. मांढरे, गजानन जाधव, तसेच सहाय्यक वनपाल संग्राम मोरे, वनरक्षक सोनूताई नाईक, कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय म्हस्के व सरचिटणीस अर्जुन सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रेसिडेंट विवेक कुलकर्णी म्हणाले, "पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही, तर प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी जोपासल्या पाहिजेत. सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या कृतींमुळे पर्यावरणावर काय परिणाम होतो, हे ओळखून त्यात सकारात्मक बदल करणे ही काळाची गरज आहे." कंपनीने पर्यावरण संवर्धनात जागतिक स्तरावर मिळवलेल्या सन्मानांचा उल्लेख करत त्यांनी ही चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले. मुख्य मानव संसाधन अधिकारी पूनम गुप्ता यांनीही पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येकाने निसर्गाशी सुसंवाद साधण्याची गरज व्यक्त केली.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते कंपनी परिसरात तब्बल १०० झाडांची लागवड करून हिरवाईचा संदेश देण्यात आला. यावर्षीच्या ‘हवामान बदल आणि निसर्गाचा ऱ्हास थांबवूया’ या संकल्पनेला अनुसरून सर्व कामगारांना प्लास्टिकला पर्याय म्हणून जूटच्या पर्यावरणपूरक पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

या निमित्ताने आयोजित विशेष कार्यशाळेत प्रा. डॉ. पंकज दास यांनी हवामान बदलाची कारणे, त्याचे दूरगामी परिणाम आणि उपाययोजना यावर अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. पर्यावरण जनजागृतीसाठी कंपनीत उभारण्यात आलेला ‘सेल्फी विथ प्लांट पॉईंट’ कर्मचाऱ्यांसाठी मुख्य आकर्षण ठरला. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झाडांसोबत सेल्फी काढून ते सोशल मीडियावर शेअर करत निसर्गाशी असलेले नाते अधोरेखित केले.

कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा आणि ऑनलाईन पर्यावरण क्विझचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी निसर्गरक्षणासाठी कटिबद्ध राहण्याची सामूहिक पर्यावरण प्रतिज्ञा घेतली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन जाधव, कुमार पवार, सुनील पानसे, अविनाश भोसले, अंशुमन जगदाळे, मोहन फडके, महादेव ससे, गुलाब बोरसे, आकाश धनवे, प्राजक्ता कानिटकर यांच्यासह एच. आर. (HR) विभागातील सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !