स्वेरी फार्मसीच्या सहा विद्यार्थ्यांचे जी-पॅट परिक्षेत यश

पंढरपूर पंचक्रोशीत कौतुक

Students' success in the GPAT exam, Solapur, Pandharpur, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)

गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित औषधनिर्माणशास्त्र (बी.फार्मसी) महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांना जी-पॅट (ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टीटयूड टेस्ट) २०२६ या राष्ट्रीय पातळीवरील परिक्षेत उज्ज्वल यश मिळाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

स्वेरी संचलित औषधनिर्माणशास्त्र तथा बी. फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे भोसले काजल रणजीत गुण २३१, (ऑल इंडिया रँक ११५२), तांबोळी अलिशा गौस गुण २२१ (ऑल इंडिया रँक १५८७), घोडके मोनाली समाधान गुण १९८ (ऑल इंडिया रँक ३१६४), पृथ्वीराज साहेबराव भुसे गुण १९२ (ऑल इंडिया रँक ३७०७) हिल्लाळ श्रेया प्रमोद गुण १८३, ( ऑल इंडिया रँक ४६३५), काळे संदीप दत्तात्रय गुण १८१,(ऑल इंडिया रँक ४८६९) अशा एकूण  सहा विद्यार्थ्यांनी एम. फार्मसीचे उच्च शिक्षण घेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील अतिशय अवघड परंतु आवश्यक असणाऱ्या जी-पॅट या परिक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. 

स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली तसेच उच्च शिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले आणि फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या या परीक्षेत उत्तुंग यश मिळविले. 

विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे पंढरपूर पंचक्रोशीत कौतुक होत आहे. सन २००६ साली स्थापन झालेल्या बी. फार्मसी महाविद्यालयाने प्रत्येक वर्षी मिळणाऱ्या उज्वल यशाची परंपरा यावर्षी देखील कायम राखली आहे. सन २०१० साली ‘संतोष गेजगे’ या विद्यार्थ्याने याच जी-पॅट परीक्षेत भारतात ११७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन यशाचा पाया खणला होता. तेथून पुढे प्रत्येक वर्षी स्वेरीच्या बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी जी-पॅट मध्ये भरघोस यश संपादन करण्याची परंपरा कायम राखली असल्याचे या निकालावरून दिसून येते.

यशस्वी विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षकांबरोबरच ‘पंढरपूर पॅटर्न’ व रात्र अभ्यासिकेला देखील देतात. मिळालेले यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे, हे मात्र निश्चित! सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बी.फार्मसी प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, प्रा.रामदास नाईकनवरे, डॉ.वृणाल मोरे, प्रा. अंबादास चिक्काळे प्रा.प्रदीप जाधव, प्रा. विजया पाटील आदी प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. 

यशस्वी विद्यार्थ्याचे स्वेरीचे संस्थापक डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ.सुरज रोंगे, यांच्यासह इतर विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी अंतर्गत असणाऱ्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.एम.जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. बनकर, इंजिनिअरींगच्या उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

      -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !