सोनके प्राथमिक शाळेत खासदार नितीन पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात रंगला 'प्रवेशोत्सव'
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सोनके (ता.कोरेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत अत्यंत उत्साही आणि आनंदमयी वातावरणात करण्यात आले. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या विशेष 'प्रवेशोत्सव' सोहळ्याला खासदार नितीन पाटील यांनी मुख्य पाहुणे म्हणून विशेष उपस्थिती दर्शवली. खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते शाळेत पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या नवोदित विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक साहित्य देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी लोकप्रतिनिधींना शाळेत पाहून चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता.
त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना खासदार नितीन पाटील म्हणाले, "विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षणाचा पाया मजबूत असेल, तरच मुले भविष्यात उत्तम नागरिक बनतील." तसेच त्यांनी सोनके शाळेच्या प्रगतीसाठी आणि शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांनी अद्ययावत संगणक कक्षाला भेट देत शाळेची पाहणी केली.
पंचायत समिती सदस्य आकाश सोळस्कर यांनी शाळेच्या स्वच्छता गृह कामासाठी पंचायत समिती मधून निधी उपलब्ध करून देण्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी लाठी काठी, लेझीम, आदी मर्दानी खेळांचे सादरीकरण केले. खासदार पाटील यांनी अद्ययावत संगणक कक्षाला भेट देऊन शाळेची पाहणी केली. कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, जिल्हा परिषद सदस्य अमित चव्हाण, पंचायत समिती सदस्य आकाश सोळस्कर, रुपाली साळुंखे, सतीश धुमाळ,
संभाजी धुमाळ, मंगेश धुमाळ दत्तात्रय धुमाळ, संजय साळुंखे, ललित मुळीक, डॉ. सुयोग लेंभे, सुर्यकांत निकम, प्रदीप जगताप, जितेंद्र जगताप, सरपंच सौ. ,पुष्पा साठे, रणजित धुमाळ, राहुल धुमाळ, शाळेचे मुख्याध्यापक, तुकाराम पवार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ. मंगल यादव, शिक्षक, ग्रामस्थ आणि पालक उपस्थित होते. संपूर्ण शाळा परिसर आकर्षक सजावटीने सजवण्यात आला होता. कार्यक्रमाचा शेवट खाऊ वाटप आणि उपस्थित आभार प्रदर्शनाने झाला.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



