वारली चित्रकलेतून अवतरला रायगडावरील 'शिवराज्याभिषेक सोहळा'

कराडच्या संदीप डाकवे यांची कलात्मक मानवंदना!

Shiva's coronation ceremony , Satara , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून सैदापूर (ता.कराड) येथील ज्ञानेश्वर काॅलनी मध्ये राहणाऱ्या संदीप डाकवे या कलाकाराने शिवकालीन इतिहासाला महाराष्ट्राच्या पारंपरिक वारली चित्रकलेच्या माध्यमातून एक वेगळी आणि कलात्मक मानवंदना दिली आहे. रायगडावरील ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळा अत्यंत आकर्षक अशा वारली शैलीत कागदावर साकारण्यात आला आहे. 

Shiva's coronation ceremony , Satara , shivshahi news.

 पेन्सिलने अत्यंत अचूक भौमितिक रचना करून, त्यावर बारीक ब्रशच्या साहाय्याने सिंहासन, छत्रपती शिवाजी महाराज, तुतारी व ढोल वाजवणारे मावळे आणि नागरिक रेखाटण्यात आले आहेत. छत्रपती शिवरायांचा इतिहास सर्वसामान्यांच्या मनातील आहे आणि वारली ही लोककला देखील जमिनीशी जोडलेली आहे. म्हणूनच या दोन घटकांची सांगड घालून हा प्रयोग केला, असे चित्रकाराने सांगितले. यापूर्वी संदीप डाकवे यांनी वारली चित्रशैलीतून श्री दत्तजयंती सोहळा आणि श्रीरामनवमी रेखाटले आहेत. रक्तातून रेखाटलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कलाकृतीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

दरम्यान, संदीप डाकवे यांनी भिंतीवर शिवराज्याभिषेक सोहळा, कवडीवर सिंहासनारुढ महाराजांची प्रतिमा, भाकरीवर छत्रपती शिवाजी महाराज तसेच मावळे व किल्ले यांच्या नावातून छत्रपती शिवरायांची प्रतिमा, रक्तातून छत्रपती शिवराय आणि शिवराज्याभिषेक लोगोचे चित्र साकारत मानवंदना दिली आहे. 

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !