रिपब्लिकन सेनेच्या वतीने सत्कार
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी अवैध धंद्याविरोधात मोहीम उघडून कारवाई केल्याबद्दल रिपब्लिकन सेनेचे नेते रमेश उबाळे यांनी त्यांचा संविधानाची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला. अवैध धंद्याविरोधात पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी उघडलेली मोहीम योग्य असून अभिमास्पद असल्याचे रमेश उबाळे यावेळी म्हणाले.
याबाबत बोलताना रमेश उबाळे म्हणाले, पोलीस अधीक्षक पदाचा चार्ज निखिल पिंगळे यांनी घेतल्यानंतर जिल्ह्यातील चक्री, जुगार अड्डा, गांजा, बंटागोळीचा व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम उघडून कारवाई सुरू केली आहे. यामुळे जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा सूळसुळाट थांबला आहे. हे जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानस्पद आहे.
सातारा जिल्ह्याला शूर विरांची परंपरा आहे. अंधश्रद्धा, व्यसनाविरोधात प्रबोधन करणारे नरेंद्र दाभोळकर हे साताऱ्याचे आहेत. या अवैध धंद्यामुळे जिल्ह्यातील युवा पिढी बरबाद होण्याच्या मार्गांवर आहे. आशा बिकट परिस्थितीत जिल्ह्याला निखिल पिंगळे यांच्या रूपाने कर्तबगार , कर्तव्यदक्ष व प्रामाणिक पोलीस अधिक्षक मिळाले आहेत. त्याचा सन्मान करुन चांगल्या कामासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याची जबाबदारी आपली असल्याची भावना रमेश उबाळे यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केली. कुठेही अवैध धंदे सुरू असतील तर थेट आमच्याशी संपर्क करण्याचे आवाहन यावेळी रमेश उबाळे यांनी केले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



