विधान परिषद निवडणूक 2026 अनुषंगाने रणवीर राऊत यांनी घेतली आमदार रामभाऊ सातपुते यांची सदिच्छा भेट!

मांडवे येथे राजकीय रणनीतीवर खलबते; माजी आमदार दीपकआबा साळुंखे यांच्या उपस्थितीने वाढले राजकीय वजन

Ranveer Raut met MLA Rambhau Satpute, Solapur, malshiras, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,माळशिरस ( प्रतिनिधी, वैभव कुलकर्णी) 

आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस आणि सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. विधान परिषदेचे उमेदवार श्री. राजेंद्र राऊत यांचे सुपुत्र श्री. रणवीर राजेंद्र राऊत यांनी आज माळशिरसचे आमदार मा. रामभाऊ सातपुते यांच्या 'श्रीराम निवास' (मांडवे) या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली.

आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये विधान परिषद निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन, पक्ष संघटनेची तळागाळातील बांधणी आणि आगामी काळातील राजकीय रणनीती यावर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.

दीपकआबा साळुंखे यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन

विशेष म्हणजे, या महत्त्वपूर्ण बैठकीला आणि चर्चेला योग्य दिशा देण्यासाठी माजी आमदार मा. दीपकआबा साळुंखे हे देखील आवर्जून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे या सदिच्छा भेटीला राजकीय दृष्ट्या मोठे वजन प्राप्त झाले असून, आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत याचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या वेळी पक्षाचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख नेत्यांमध्ये झालेली ही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

                       


shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

----------------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !