स्वेरी फार्मसीच्या प्रा.सतीश मांडवे यांना पीएच.डी. प्रदान

प्रा. सतिश वसंत मांडवे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार

Prof. Satish Mandve Awarded Ph.D., Solapur, Pandharpur, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, (पंढरपूर प्रतिनिधी)

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँन्ड रिसर्च इन्स्टिट्युट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी (पॉली.) चे प्रा. सतिश वसंत मांडवे यांना नुकतीच पंजाब मधील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी या विद्यापीठाकडून फार्मसीमध्ये पीएच.डी. प्रदान करण्यात आली. ‘डेव्हलपमेंट अँड इव्हॅल्युएशन ऑफ मॉडिफाइड रिलीज टॅब्लेट्स ऑफ लोव्हास्टॅटिन अँड ओलिनोलिक ऍसिड’ या विषयावर त्यांनी आपला शोधप्रबंध विद्यापीठास सादर केला होता. ही पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

         डॉ. नरेंद्र कुमार पांडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे यांच्या सहकार्याने प्रा. सतीश मांडवे यांनी फार्मसीमधील पीएच.डी. पूर्ण केली आहे. डॉ. मांडवे यांनी पीएच.डी. च्या संशोधनात वेगवेगळ्या पद्धतीच्या मॉडिफाइड रिलीज टॅब्लेट्सची निर्मिती करून त्यांची क्षमता तपासली होती. आत्तापर्यंत डॉ. मांडवे यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये एकूण आठ संशोधनपर पेपर्स प्रसिद्ध झाले आहेत. पीएच.डी. प्राप्त केल्याबद्धल स्वेरीच्या वतीने डॉ. मांडवे यांचा सत्कार एरंडोळ (ता.आजरा. जि.कोल्हापूर) येथील एरंडोळ हायस्कूलचे मुख्याध्यापक मलाप्पा तळवलकर यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. मांडवे हे स्वेरीच्या डी.फार्मसी महाविद्यालयात गेल्या पंधरा वर्षापासून उत्कृष्टपणे ज्ञानदान करत असून नऊ वर्षांपासून प्राचार्य पदी कार्यरत आहेत. 

स्वेरीचे संस्थापक डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ.सुरज रोंगे, यांच्यासह इतर विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असणाऱ्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.एम.जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. बनकर, इंजिनिअरींगच्या उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी डॉ.मांडवे यांचे अभिनंदन केले आहे. 

चौकट- स्वेरीचे संस्थापक डॉ. बी.पी. रोंगे सर हे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उच्चशिक्षण घेण्यासाठी व आपली शैक्षणिक पात्रता अद्ययावत करण्यासाठी नेहमी प्रेरणा व प्रोत्साहन देत असतात. स्वेरीतील सुमारे ४५ प्राध्यापकांनी आय.आय.टी., एन.आय.टी., आय. आय. एससी. अशा विविध प्रख्यात संस्थामधून पीएच.डी. पूर्ण केली असून सुमारे ६० प्राध्यापक पीएच.डी. पूर्ण करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !