एस. सी. उपवर्गीकरणाविरोधात ३० जूनच्या मुंबईतील महामोर्चात लाखोंच्या संख्येने सामील व्हा - रमेश उबाळे

रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश उबाळे यांचे मागासवर्गीय समाजाला आवाहन; कोल्हापुरात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न 

Mass rally against sub-categorization, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा/कोल्हापूर (प्रतिनिधी, शुभम कोदे)

सरकारने अनुसूचित जाती (एस. सी.) उपवर्गीकरणाचा जो घाट घातला आहे, ज्यामुळे मागासवर्गीयांचे आरक्षण धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयाविरोधात आगामी ३० जून रोजी मुंबई येथे होणाऱ्या महामोर्चाला सर्व पक्ष, गट आणि तट बाजूला ठेवून मागासवर्गीय समाजाने लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश उबाळे यांनी केले आहे.

रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चाच्या नियोजनासाठी आणि जनजागृतीसाठी रमेश उबाळे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांना ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असताना, दसरा चौक येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रमेश उबाळे यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

आरक्षण आणि संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल!

उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रमेश उबाळे म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संघर्षातून आरक्षण मिळवून दिले आहे. हे आरक्षण टिकवण्याची सर्वस्वी जबाबदारी आता आपली आहे. सरकारकडून आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न होत असताना आपण जात, पात आणि राजकीय मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे. बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ३० जून रोजी होणारा मोर्चा ऐतिहासिक ठरला पाहिजे, तरच सरकारला जाग येईल. संविधान वाचवण्यासाठी आता नवा संघर्ष करण्याची वेळ आली असून, रस्त्यावर उतरून हा लढा जिंकायचा आहे."

रुग्णांना फळवाटप आणि संघटनात्मक चर्चा

यावेळी उपवर्गीकरणाविरोधातील लढ्याला अधिक बळ देण्यासाठी आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत महामोर्चाचा संदेश पोहोचवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्धार व्यक्त केला. तसेच पक्ष संघटना वाढवण्याबाबतही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात जाऊन रुग्णांना फळवाटप करण्यात आले. या दौऱ्यात रिपब्लिकन सेनेच्या विविध विंगचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढणार!

 "पश्चिम महाराष्ट्रात रिपब्लिकन सेनेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात आमचा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना आमदार, खासदार करून आनंदराज आंबेडकर यांचे स्वप्न आम्ही नक्कीच पूर्ण करू," असा विश्वास रमेश उबाळे यांनी यावेळी व्यक्त केला.

     -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !