कराड तालुका ग्रामीणचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचा कुस्ती संघटनेकडून सन्मान; वाढदिवसानिमित्त गौरव
शिवशाही वृत्तसेवा,कराड (सातारा प्रतिनिधी - शुभम कोदे)
कराड तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेंद्र जयवंतराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त कराड तालुका कुस्ती संघ, कला क्रीडा सांस्कृतिक ट्रस्ट महाराष्ट्र राज्य आणि मित्र परिवाराच्या वतीने त्यांना 'सन्मानपत्र' प्रदान करून अभिष्टचिंतन करण्यात आले. प्रशासनातील एक 'राजामाणूस', उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी, प्रामाणिक सेवा आणि समाजाप्रती अतूट बांधिलकी असणारे अधिकारी म्हणून महेंद्र जगताप यांचा कराड तालुक्यात मोठा नावलौकिक आहे.
त्यांच्या याच उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी कराड तालुका कुस्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ कुस्ती संघटक पै. तानाजी चवरे साळशिरंबेकर व त्यांच्या सहकारी मित्र परिवाराने त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. कर्तव्य, शिस्त आणि जनसेवा यांचा त्रिवेणी संगम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगताप साहेबांना यावेळी सन्मानपत्र देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. या आगळ्यावेगळ्या गौरव सोहळा आणि सन्मानपत्राची सध्या कराड तालुक्यात मोठी चर्चा सुरू आहे.
मान्यवरांची उपस्थिती
हा गौरव सोहळा संपन्न होताना 'लोकमत'चे कराड तालुका प्रमुख प्रमोद सुकरे, मुंबई कामगार केसरी पै. सचिन बागट, सुरेश पाटील, विकास पाटील (भैरवनाथनगर), नितीन मोरे (येवती) आणि जननायक केसरी पै. किरण चोरगे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या उत्कृष्ट कार्यपद्धतीचे कौतुक करत त्यांना दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



