खेड बुद्रुक येथे ओढा खोलीकरण व रुंदीकरण कामाची प्रांताधिकाऱ्यांकडून पाहणी

जलसंधारण व पाणी संवर्धनासाठी उपक्रम मैलाचा दगड ठरणार; स्थानिक नागरिकांकडून कौतुक

Deepening and widening of the stream, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

खेड बुद्रुक येथे श्रमजीविका संस्था (सातारा) आणि माऊली संस्था (सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ओढा खोलीकरण व रुंदीकरण कामाला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी प्रांताधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सुहास थोरात तसेच गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली व संबंधित संस्था आणि ग्रामस्थांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले.

     जलसंधारण आणि पाणी संवर्धनाच्या दृष्टीने हे काम अत्यंत महत्त्वपूर्ण असून, आगामी काळात परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरणार आहे. अधिकाऱ्यांनी सुरू असलेल्या कामाच्या गतीबद्दल आणि नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

     या पाहणी दौऱ्यादरम्यान गावातील अनेक प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने गणेश धायगुडे पाटील (माजी आदर्श सरपंच), नारायण पाटील (संचालक, लोणंद मार्केट कमिटी), श्रीमती उमाताई रासकर (सरपंच, खेड गाव), देवकाते (मंडळ अधिकारी), श्रीमती विना पुंड (ग्राम महसूल अधिकारी), शिवाजी यादव (ग्रामविकास अधिकारी)

तसेच माजी सरपंच सुभाष ठोंबरे, सचिन धायगुडे, तानाजी धायगुडे, चेअरमन विजय धायगुडे, अंकुश धायगुडे, विठ्ठल माने, ज्ञानेश्वर धायगुडे, सुरज डोईफोडे, रामभाऊ धायगुडे, विनायक मासाळ यांच्यासह खेड बुद्रुक येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण झाल्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात अडवले आणि जिरवले जाईल. यामुळे परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांच्या (बोअरवेल) पाणीपातळीत मोठी वाढ होणार आहे. दुष्काळावर मात करणाऱ्या या कौतुकास्पद उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी व शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले असून, दोन्ही संस्थांचे आभार मानले आहेत.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !