वाई तालुक्यात भद्रेश्वर ११ आयोजित भव्य हाफ-पिच क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्ह्याबाहेरील अनेक नामांकित संघांनीही सहभाग नोंदवत स्पर्धेची रंगत वाढवली

Cricket tournament, sports, Wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई तालुक्यात भद्रेश्वर ११ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य हाफ-पिच क्रिकेट स्पर्धेला खेळाडू व क्रिकेटप्रेमींकडून मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे केवळ वाई तालुक्यातीलच नव्हे तर सातारा जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील अनेक नामांकित संघांनीही सहभाग नोंदवत स्पर्धेची रंगत वाढवली.

स्पर्धेच्या भव्य आणि यशस्वी आयोजनासाठी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी व व्यवसायिकांनी मोलाचे सहकार्य केले. यामध्ये नगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक सचिन सावंत, तेजस जमदाडे, बाळू भुसारी, लक्ष्मी ज्वेलर्स (वाई), श्री गुरुकृपा साडीज (वाई) तसेच बप्पा प्युअर व्हेज यांचे विशेष व मोलाचे योगदान लाभले.

या स्पर्धेचे नियोजन व व्यवस्थापन  आदेश  जगताप, राहुल भोसले, अक्की इथापे आणि संकेत सणस यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. त्यांच्या नियोजनामुळे स्पर्धा शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि यशस्वी वातावरणात पार पडली.

क्रिकेटला प्रोत्साहन देत ग्रामीण भागातील खेळाडूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा निश्चितच प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थित मान्यवर व खेळाडूंनी व्यक्त केली. भद्रेश्वर ११ च्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून भविष्यातही अशाच दर्जेदार स्पर्धांचे आयोजन करण्याचा आयोजकांचा मानस आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !