नातेपुते पोलिसांची दमदार कामगिरी - बनावट पोलीस बनून ७६ वर्षीय वृद्धेची फसवणूक

१ लाख ६६ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक

Accused arrested for stealing jewelry,Natepute, Solapur, malshiras, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा ,नातेपुते(प्रतिनिधी वैभव कुलकर्णी )

'सरकारने अंगावर सोने घालण्यास बंदी घातली आहे,' अशी खोटी बतावणी करून, स्वतःला पोलीस असल्याचे भासवणाऱ्या एका भामट्याने ७६ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील १ लाख ६६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातचलाखीने चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपीला नातेपुते पोलिसांनी कल्याण येथून जेरबंद केले आहे.

​नेमकी घटना काय?

दिनांक ९ जून २०२६ रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास फिर्यादी विमल शंकर जैन (वय ७६, रा. नातेपुते) या नातेपुते एसटी स्टँडजवळील अहिल्यादेवी पुतळ्याजवळ थांबल्या होत्या. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी विमल जैन यांना गाठले. "आंम्ही पोलीस आहोत आणि सध्या सरकारने अंगावर सोने घालण्यास बंदी घातली आहे," असे सांगून त्यांना भीती घातली. सुरक्षिततेचे कारण देत भामट्यांनी वृद्ध महिलेला गळ्यातील सोन्याचे दागिने काढून पिशवीत ठेवण्यास सांगितले. याच संधीचा फायदा घेत हातचलाखी करून त्यांनी दागिन्यांची पिशवी लंपास केली आणि घटनास्थळावरून पोबारा केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

​पोलीस कारवाई आणि आरोपीला अटक

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून नातेपुते पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक पुरावे आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, हा गुन्हा कल्याण येथील टोळीने केल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे नातेपुते पोलिसांनी कल्याण येथील खडकपाडा पोलिसांच्या मदतीने सापळा रचला आणि मुख्य आरोपी शहाजुर अफसर इराणी (वय ५०, रा. मंगल नगर, अटारी रोड, कल्याण) याला ताब्यात घेतले.

​जप्त केलेला मुद्देमाल:

आरोपींकडून खालील दागिने हस्तगत करण्यात आले आहेत:

​२१ ग्रॅम वजनाचे बदाम आकाराचे सोन्याचे लॉकेट (किंमत ८१,००० रुपये).

​२२ ग्रॅम वजनाचे त्रिकोण लोगो असलेले सोन्याचे लॉकेट (किंमत ८५,००० रुपये).

​एकूण मुद्देमाल: १ लाख ६६ हजार रुपये.

​पोलीस पथकाची कामगिरी

ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि अकलूज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, सफौ. देविदास धोत्रे, पोलीस नाईक राकेश लोहार, रणजीत मदने, असलम शेख, गणेश कापसे आणि खडकपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भूषण देवरे, सफौ. सुधीर पाटील, पोपट दुलगुंड यांच्या पथकाने मोलाची कामगिरी बजावली.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !