रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी डॉ. संतोष मोरे यांचा शिंदेवाडीत विशेष सन्मान
शिवशाही वृत्तसेवा, शिंदेवाडी (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी )
रयत शिक्षण संस्थेच्या हनुमान विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शिंदेवाडी येथील सन २००१-२००२ च्या बॅचचे माजी विद्यार्थी आणि डेप्युटी कमिशनर - मुख्याधिकारी वर्ग-१ या प्रतिष्ठित पदावर पदोन्नती मिळालेले डॉ. संतोष मोरे (साहेब) यांचा शाळेच्या वतीने सोमवारी गौरव करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अमित घाडगे आणि उपाध्यक्ष श्री. सुनील देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला.
सोमवार, दिनांक २९ जून २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमात शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. देठे मॅडम यांच्या हस्ते डॉ. संतोष मोरे यांचा सत्कार करण्यात आला. "जिद्द, परिश्रम आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यशाची सर्वोच्च शिखरे गाठता येतात, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे डॉ. संतोष मोरे आहेत," अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी डॉ. मोरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात ध्येय निश्चित करून कष्ट घेण्याचे आवाहन केले. तसेच, आपल्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या शाळेसाठी भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचनही त्यांनी आपल्या मनोगतातून दिले.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अमित घाडगे, उपाध्यक्ष श्री. सुनील देशमुख यांच्यासह डॉ. अमोल घाडगे, राहुल तनपुरे, ज्ञानेश्वर जगदाळे, गणेश रणवरे, दिनेश जाधव, विरेंद्र शिंदे, दीपक घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शाळेचा संपूर्ण शिक्षक वृंद, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी डॉ. मोरे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



