कराडच्या महिला महाविद्यालयात माजी विद्यार्थिनी मेळावा उत्साहात संपन्न!

महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या कु. श्वेता यादव हिचा विशेष सत्कार

Alumni gathering‌, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा ,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

शिक्षण मंडळ कराड संचलित, महिला महाविद्यालय कराड येथे माजी विद्यार्थिनी संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला माजी विद्यार्थिनी मेळावा अत्यंत उत्साही आणि भावुक वातावरणात संपन्न झाला.

 कार्यक्रमाची सुरुवात पारंपारिक पद्धतीला फाटा देत, मान्यवरांच्या हस्ते कुंडीतील रोपाला पाणी देऊन करण्यात आली. या अनोख्या उपक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. माजी विद्यार्थिनी संघाच्या अध्यक्षा सौ. ज्योती पाटील यांनी प्रास्ताविक केले व सर्व माजी विद्यार्थिनींचे महाविद्यालयात स्वागत केले.

     या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे महिला महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. श्वेता यादव हिची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आलेला विशेष सत्कार. श्वेताच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव झाला.

     याप्रसंगी सौ. स्वप्ना केतकर, सौ. शोभा पाटील, श्रीमती प्रतीक्षा भाडळकर, तेजस्विनी जोशी आणि स्वाती कलबुर्गी या माजी विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त करताना कॉलेज जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला व महाविद्यालयाने घडवलेल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

     कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत बजरंग बल्लाळ यांनी भूषवले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी माजी विद्यार्थिनींच्या प्रगतीचे कौतुक केले व महाविद्यालयाचा आलेख असाच उंचावत राहील, असा विश्वास व्यक्त केला.

     या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्रो. उज्वला ताटे, सौ. ज्योती पाटील (अध्यक्ष, माजी विद्यार्थिनी संघ), सौ. स्मिता सावंत, सौ. वैशाली सुभेदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आलेल्या सर्व पाहुण्यांचा महाविद्यालयाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

     कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. विलास सखाराम सुर्वे व प्रा. किशोर गुजर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. अखिलेश शिंदे यांनी मानले. या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने माजी विद्यार्थिनी, प्राध्यापक, प्राध्यापिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. एकूणच हा सोहळा माजी विद्यार्थिनींसाठी एक अविस्मरणीय ठेवा ठरला.

     -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !