वारस नोंदीसाठी २५०० रुपये उकळणारी महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात

सातारा महसूल विभागाला लाचखोरीची वाळवी

Anti corruption bureau trapped lady talathi, Archana gavde, revenue department corruption, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

सातारा जिल्ह्यातील महसूल प्रशासनाला लागलेली लाचखोरीची वाळवी संपण्याचे नाव घेत नाहीये. वारंवार होणाऱ्या कारवायांतून महसूल कर्मचारी कोणताही बोध घेताना दिसत नसून, आता कराड तालुक्यातील चचेगाव येथील महिला तलाठी अर्चना गावडे या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्या आहेत. एका शेतकऱ्याकडून वारसाची नोंद करण्यासाठी २५०० रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या घटनेमुळे कराड परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून अशा लाचखोर अधिकाऱ्यांना शासनाने थेट सेवेतून कायमचे घरी बसवावे, अशी संतप्त मागणी नागरिकांमधून होत आहे.

तक्रारदार शेतकरी आपल्या जमिनीच्या वारस नोंदीसाठी गेल्या काही दिवसांपासून चचेगाव तलाठी कार्यालयात चकरा मारत होते. मात्र, हे शासकीय काम करण्यासाठी तलाठी अर्चना गावडे यांनी २५०० रुपयांची लाच मागितली. शेतकऱ्याची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली.

तक्रारीची शहानिशा केल्यानंतर 'एसीबी'च्या पथकाने गुरुवारी चचेगाव तलाठी कार्यालय परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे दुपारी तक्रारदार शेतकरी कार्यालयात पोहोचले. त्यांनी 'एसीबी'ने केमिकल पावडर लावलेल्या २५०० रुपयांच्या नोटा तलाठी अर्चना गावडे यांच्या स्वाधीन केल्या. गावडे यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच, आजूबाजूला दबा धरून बसलेल्या लाचलुचपत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर झडप घालून त्यांना रंगेहात पकडले.

या कारवाईनंतर अर्चना गावडे यांना तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची आणि पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

सातारा जिल्ह्यात महसूल विभागातील लाचखोरीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. लाचखोर अधिकाऱ्यांना कायद्याचा कसलाही डर उरलेला नाही, हेच या घटनेवरून पुन्हा सिद्ध झाले आहे. "दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी केवळ निलंबन पुरेसे नाही, तर अशा लाचखोरांना शासकीय सेवेतून कायमचे बडतर्फ केले पाहिजे," अशा तीव्र भावना कराड परिसरातील सुजाण नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !