अधिक मास सप्ताहासाठी आले होते पंढरीत - परसाळे बारामतीकर मठाजवळून बेपत्ता झाल्याची पंढरपूर शहर पोलिसांत नोंद
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (विशेष प्रतिनिधी)
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे धार्मिक विधी व दर्शनासाठी आलेल्या माढा तालुक्यातील मानेगाव येथील रहिवासी असलेले ८६ वर्षीय वृद्ध गुलाबराव बापूराव देशमुख हे पंढरपूर शहरातून बेपत्ता झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही ते मिळून आलेले नाहीत. या संदर्भात त्यांचे सुपुत्र विजय गुलाबराव देशमुख यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात रीतसर मिसिंग (बेपत्ता) तक्रार दाखल केली असून पोलीस प्रशासनाकडून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मानेगाव (ता. माढा, जि. सोलापूर) येथील रहिवासी असलेले गुलाबराव बापूराव देशमुख (वय ८६ वर्षे) हे अधिक मास सप्ताह निमित्ताने धार्मिक कार्यक्रमासाठी पंढरपूर शहरात आले होते. मंगळवार, दिनांक १९ मे २०२६ रोजी दुपारी ०२:०० वाजण्याच्या सुमारास पंढरपूर येथील 'परसाळे बारामतीकर मठ' परिसरातून ते कोणास काहीही न सांगता अचानक निघून गेले. त्यानंतर ते परत आलेच नाहीत.
त्यांचे नातेवाईक आणि कुटुंबीयांनी पंढरपूर शहर, मठाचा परिसर तसेच आजूबाजूच्या सर्व संभाव्य ठिकाणी त्यांचा कसून शोध घेतला. मात्र, अद्यापपर्यंत त्यांचा कोणताही पत्ता लागलेला नाही. अखेर या प्रकरणी सोमवार, दिनांक २५ मे २०२६ रोजी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात मिसिंग क्रमांक ५९/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे.
बेपत्ता व्यक्तीचे वर्णन:नाव: गुलाबराव बापूराव देशमुखवय: ८६ वर्षेरहिवासी: रा. मानेगाव, ता. माढा, जि. सोलापूरशारीरिक वर्णन: उंची ५ फूट ५ इंच, रंग गोरा, बांधा मध्यम, नाक सरळ, चेहरा उभट, केस पांढरे.पोशाख: अंगात पांढरा शर्ट, पांढऱ्या रंगाचे धोतर आणि डोक्याला पांढरा फेटा.इतर वैशिष्ट्ये: डोळ्याला चष्मा वापरतात, हातात धातूची काठी आहे. बोलण्याची भाषा मराठी आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल (पोहेकॉ/) ८५२ महेश पवार हे करत आहेत. सदर वर्णनाची व्यक्ती कोणालाही आढळून आल्यास अथवा त्यांच्याबाबत काहीही माहिती मिळाल्यास तातडीने खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस प्रशासन आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.
संपर्क आणि माहितीसाठी:तपास अधिकारी: पोहेकॉ/ ८५२ महेश पवार –मो. नं. 9529959970तपास अंमलदार: पोहेकॉ/ २९१ घोडके (पंढरपूर शहर पोलीस ठाणे)नातेवाईक: विजय गुलाबराव देशमुख (मिसिंग व्यक्तीचे सुपुत्र)मो.नं. 9860208339 / 7385677062बापूसाहेब देशमुख - 94226 47299
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



