शिवाजीराव ढमाळ यांचे निधन

निधन वार्ता 

death news, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे )

ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चे उपाध्यक्ष चंद्रकांत ढमाळ यांचे वडील व सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजीराव हनुमंतराव उर्फ  बापु ढमाळ वय 92 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 

त्यांचे पश्चात विवाहित एक मुलगा, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. 

शिवाजीराव ढमाळ यांनी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी या पदावरून महत्वपूर्ण कामगिरी केली. आसवली तालुका खंडाळा येथील संत शिक्षण संस्थेचे  अध्यक्ष म्हणून व श्री जन्नीदेवी  देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त म्हणून मोलाची कामगिरी केली. लोकसहभागातून दहावीपर्यंत विद्यार्थ्यांचे ते अल्पशा खर्चात वसतीगृह चालवीत आहेत. 

त्यांचेवर आसवली येथील स्मशानभूमीत मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी झालेल्या शोकसभेत जिजाबा पवार, दत्तानाना ढसाळ, चंद्रकांत ढमाळ, अतुल पवार, अनिरुद्ध गाढवे, घाडगे गुरुजी, काकडे गुरुजी, जंगम गुरुजी आदिनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी मिलींददादा पाटील, ऋषिकेश धायगुडे, शंकरराव गाढवे सर, रतनसिंह शिंदे, रत्नकांत भोसले, अनिरुद्ध गाढवे, लक्ष्मण चव्हाण,ज्ञानदीप संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी , परीसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

    -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !