पत्रकार भगवान साळवे यांची शेतकरी आत्महत्या मदत समितीवर सदस्यपदी निवड

तालुकास्तरीय समित्यांचे गठन करण्याचा निर्णय

Farmer suicides committee, journalist bhagvan salave, sindkhedraja, buldhana, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे)

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तातडीने मदत मिळावी आणि प्रकरणांचा विलंब कमी व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठन करत त्याच धर्तीवर तालुकास्तरीय समित्यांचे गठन करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील या नव्या समितीत पत्रकार भगवान साळवे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने  आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत, सामाजिक सुरक्षा आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर समित्या कार्यरत राहणार आहेत.

यापूर्वी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत दिली जात होती; मात्र आता नियमित अर्थसंकल्पातून निधी उपलब्ध करून मदत देण्यात येणार आहे. अभ्यास समितीच्या शिफारशीनुसार प्रक्रियेमधील विलंब टाळण्यासाठी समितीच्या संरचनेत बदल करण्यात आले आहेत.

तालुका स्तरीय समितीमध्ये उपविभागीय अधिकारी (SDM) अध्यक्ष असतील, तर तहसीलदार सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. याशिवाय गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, सहायक निबंधक सहकारी संस्था, अग्रणी बँक प्रतिनिधी, पशुसंवर्धन अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी आणि सामाजिक संस्थेचा प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला आहे.

पत्रकार भगवान साळवे यांची या समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याने सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकरी आणि सामाजिक क्षेत्रातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल ते आपल्या नियुक्तीचे श्रेय आमदार मनोज कायंदे बळीवंश चे नितीन कायंदे यांना देतात शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये तातडीने मदत आणि प्रभावी समन्वय साधण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !