वाई वकील संघ निवडणुकीत ॲड. जयंत गायकवाड अध्यक्ष - तर ॲड. सागर मोरे उपाध्यक्षपदी विजयी

निवडणूक अधिकारी व सहकाऱ्यांकडून प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे संपन्न

Bar association election, Wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

 वाई वकील संघाच्या सन २०२६-२७ या वर्षाकरिता अत्यंत चुरशीने पार पडलेल्या निवडणुकीत ॲड. जयंत गायकवाड यांची अध्यक्षपदी, तर ॲड. सागर मोरे यांची उपाध्यक्षपदी शानदार निवड झाली आहे. यासोबतच खजिनदारपदी ॲड. अविनाश गजरे यांनी विजय मिळवला असून, पुरुष सदस्य म्हणून ॲड. कमलेश लोखंडे, ॲड. शिवदत्त दाहोत्रे व ॲड. स्वप्नील आवळे हे बहुमताने निवडून आले आहेत. या सर्व विजयी उमेदवारांचे वकील वर्ग आणि नागरिकांकडून जल्लोषात स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.

न्यायव्यवस्थेतील पारदर्शकता अधिक दृढ करणे, तरुण वकिलांचे संघटन आणि वकिली क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हे नवनिर्वाचित नेतृत्व आगामी कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी केली.

     ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत, निःपक्षपातीपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. सागर शंकर मोरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. अमित देशमाने व ॲड. बजरंग गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच त्यांना सहकार्य करणारे ॲड. शरद गाढवे व ॲड. प्रमोद गोळे यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे संपूर्ण प्रक्रिया आदर्शवत ठरली. निवडणूक शांततेत पार पाडल्याबद्दल या सर्व निवडणूक अधिकारी व सहकाऱ्यांचे वकील संघाच्या वतीने विशेष कौतुक व मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

     नवनिर्वाचित कार्यकारिणीला सर्व स्तरांतून पुढील यशस्वी वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !