शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते पंजाबराव पाटील यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या पुस्तकाला मान्यवरांनी दाद

कराडात ‘लोकशाहीतील स्वातंत्र्यसैनिक पंजाबराव पाटील’ पुस्तकाचे प्रकाशन

Book publishing ceremony, panjabrao patil, Satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

लोकशाहीतील स्वातंत्र्यसैनिक पंजाबराव पाटील’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवारी कराड येथे उत्साहात पार पडला. शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते पंजाबराव पाटील यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या या पुस्तकाला उपस्थित मान्यवरांनी विशेष दाद दिली.

     पंजाबराव पाटील यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी अनेक प्रभावी आंदोलने उभारून ती यशस्वी केली. त्यांच्या संघर्षमय कार्याचा आणि शेतकरी चळवळीतील योगदानाचा सविस्तर आढावा या पुस्तकातून मांडण्यात आला आहे.

     या कार्यक्रमास रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आ. सदाभाऊ खोत, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील, दलित महासंघाचे प्रा. मच्छिन्द्र सकटे, बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक सदस्य बी. जी. काका पाटील, बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील तसेच रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक गुजर उपस्थित होते.

     मान्यवरांनी आपल्या भाषणातून पंजाबराव पाटील यांच्या शेतकरी आंदोलनातील योगदानाचा गौरव करत त्यांच्या कार्यातून नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमास शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बळीराजा शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष गणेश शेवाळे, महाराष्ट्र राज्य बळीराजा शेतकरी महिला संघटनेच्या संजीवनी पवार, बळीराजा कामगार संघटनेचे संपतराव जगताप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहाजीबापू पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे अशोक सलगर, रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या हासन मुल्ला, प्रगतशील शेतकरी हौसेराव शेवाळे, श्रीरंग देशमुख, नामदेव कारंडे, महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार शेतकरी संघटनेचे राजू पाटील, बळीराजा असंघटित कामगार संघटनेचे निवास गायकवाड, महिला कामगार संघटनेच्या रुक्मिणी जगताप, बळीराजा कामगार संघटनेचे प्रवीण फल्ले आदी मान्यवर तसेच महाराष्ट्रातील सर्व पक्षी शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार गणेश शेवाळे यांनी मांडले.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !