सातार्‍यात अमेरिकन नागरिकांना लुटणारे बोगस कॉल सेंटर उद्ध्वस्त - १७ जण गजाआड

डिजिटल अरेस्टची भीती दाखवून डॉलरमध्ये उकळायचे पैसे

Digital arrest fraud, police, 17 arrested, koregaon, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

अमेरिकन नागरिकांना 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सातारा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. कोरेगाव (जि. सातारा) येथे सुरू असलेले बोगस कॉल सेंटर पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केले असून, याप्रकरणी १७ जणांना अटक करण्यात आली आहे.

सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटर्सवर लक्ष ठेवून कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी एक विशेष पथक तयार केले होते.

२२ मे २०२६ रोजी पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना गोपनीय खबऱ्या मार्फत बातमी मिळाली की, कोरेगाव ते रहिमतपूर रोडवरील सुभाषनगरमधील 'रिलायबल अपार्टमेंट'मध्ये 'श्रीसाई लॉजिस्टिक्स ॲन्ड कन्सल्टंट्स'च्या नावाने एक बोगस कॉल सेंटर चालवले जात आहे. हे केंद्र फेब्रुवारी २०२६ पासून कार्यरत होते

पोलिसांनी २३ मे २०२६ रोजी पहाटे छापा टाकला असता, तिथे १७ पुरुष व ४ महिला बेकायदेशीररित्या कॉल सेंटर चालवताना आढळले. ही टोळी अमेरिकन नागरिकांना ऑनलाईन ॲपद्वारे संपर्क साधत असे. "तुम्ही ॲमेझॉनवरून एक वस्तू ऑर्डर केली आहे," असे सांगून त्यांना घाबरवले जात असे. समोरच्या व्यक्तीने ऑर्डर नाकारल्यास, त्यांना बनावट मेसेज आणि ऑर्डर क्रमांक पाठवून संभ्रमात टाकले जाई. त्यानंतर, "तुम्हाला 'डिजिटल अरेस्ट' केले जाईल," अशी भीती घालून गिफ्ट व्हाउचरच्या माध्यमातून डॉलर्समध्ये रक्कम उकळली जात होत

याप्रकरणी पोलिसांनी १७ आरोपींना अटक केली आहे, ज्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

१) सागर हरिश्चंद्र सुर्यवंशी (वय ३३ - कॉल सेंटर मालक), २) विरेंद्र विनोद बोडरे (वय २७), ३) अक्षय रामचंद्र भंडारी (वय २८), ४) गुरुप्रसाद प्रताप राणे (वय ३१), ५) मनिष दिनेश जोशी (वय २८), ६) शमशुद्दीन सफाट सय्यद (वय ३८), ७) गौरव भानुदास लांडगे (वय २५), ८) अभिषेक संजय गुप्ता (वय २३), ९) इशांत संजय खांडेकर (वय २५), १०) रितेश चंद्रेश चौहाण (वय २६), ११) बाबू व्यंकटेश चलवादी (वय २९), १२) अवि अजय वानखेडे (वय २४), १३) दिपक सुनिल खंडारे (वय २५), १४) मोहंमद शफिक सलीम कोकणे (वय २८), १५) ओमकार संजय घार्गे (वय २४), १६) दिपेन विवेक जाधव (वय २५), १७) लेबीन लारसन सायमन (वय २४).

कोरेगाव पोलीस ठाण्यात या १७ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२), ३१८(४), ६१(१), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(क) व ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पारितोष दातीर व

पोलीस अंमलदार अतिश घाडगे, शिवाजी गुरव, विजय कांबळे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, शरद बेबले, मंगेश महाडीक, लक्ष्मण जगधने,  प्रविण फडतरे, अमोल माने, लैलेश फडतरे, जयवंत खांडके, हसन तडवी, अमित झेंडे, संदिप पाटील, राजु कांबळे, अरुण पाटील, स्वप्नील शिंदे, प्रविण कांबळे, अमित सपकाळ, अमित माने, अविनाश चव्हाण, अजित कर्णे, मुनीर मुल्ला, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, महेश निर्मळ,संकेत निकम, धीरज महाडीक, रोहित निकम, सचिन ससाणे, स्वप्निल दौंड, मपोहवा शकुंतला सणस, अधिका वीर यांनी यशस्वीपणे पार पाडली.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !