शिरूर मधून दहा लाखांचे प्लंबिंग साहित्य चोरी

आज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल 

Theft of plumbing materials, Pune, shirur, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)

शिरूर शहरा जवळील पाषाण मळा येथे रयत रेसिडेन्सी च्या सुरू असलेल्या बिल्डिंग जवळून तब्बल दहा लाखांचे प्लंबिंग मटेरियल व इतर साहित्य चोरी गेल्याची घटना घडली असल्याने शिरूर पोलीस स्टेशन येथे आज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शिरूर शहरातील पाषाण मळा येथे रयत रेसिडेन्सी बिल्डिंगचे बांधकाम सुरू असून सदर ठिकाणी एका खोलीमध्ये बिल्डिंग साठी लागणारे पाईप दरवाजाचे लॉक यांचे इत्यादी साहित्य आणून ठेवलेले होते, दिवसभर काम केल्यानंतर सदर काही कामगार घरी गेलेले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी कामगार त्या ठिकाणी आले असता त्यांना साइटवरील खोलीच्या पाठीमागील पत्र्याचे स्क्रू उचकटलेले दिसून आले त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती संबंधितांना देत खोलीमध्ये पाहणी केली असता खोलीमधील तब्बल दहा लाख रुपये किमतीचे प्लंबिंग मटेरियल ,दरवाजाचे लॉक, फिटिंगचे मटेरियल असे साहित्य चोरीला गेल्याचे दिसून आले याबाबत उल्हास शंकरराव वाळसे वय 50 वर्षे रा प्रीतम नगर शिरूर ता शिरूर जी पुणे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी त्यांनी पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नखाते हे करत आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !