सेंट झेवियर्सचे शिवाजी जाधव यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार

पाचगणीचे नाव महाराष्ट्रात चमकले! 

State Exemplary Teacher Award, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

शिक्षण क्षेत्रातील निस्सीम सेवा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या शिक्षकाचा गौरव म्हणजे समाजाचा गौरव असतो. पाचगणी येथील प्रसिद्ध सेंट झेवियर्स हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक शिवाजी जाधव यांना २०२५-२६ सालचा प्रतिष्ठेचा “महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान करण्यात आला. ध्येय फाउंडेशन महाराष्ट्र तर्फे आयोजित एका भव्य सोहळ्यात हा बहुमान त्यांना बहाल करण्यात आला.

     पुणे, निगडी येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृहात पार पडलेल्या ‘एज्युकेशन आयकॉन्स समिट – २०२६’ मध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते दत्तात्रेय वारे गुरुजी यांच्या शुभहस्ते जाधव सरांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि शाल-श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित शिक्षणतज्ज्ञांच्या टाळ्यांच्या कडकडाटात जाधव सरांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

     संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधून अत्यंत काटेकोर निवड प्रक्रियेद्वारे प्रत्येक तालुक्यातून केवळ एका शिक्षकाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. महाबळेश्वर तालुक्यातून शिवाजी जाधव यांनी आपल्या उत्कृष्ट अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांमधील शिस्त आणि नैतिक मूल्यांची जोपासना, तसेच राबवलेले नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रकल्प या जोरावर या पुरस्कारावर आपले नाव कोरले.

     जाधव सर केवळ वर्गातील अध्यापनापुरते मर्यादित न राहता, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करण्यासाठी आणि सामाजिक जनजागृतीसाठी सतत कार्यरत असतात. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची आणि शैक्षणिक गुणवत्तेची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे.

     या यशाबद्दल सेंट झेवियर्स हायस्कूलचे व्यवस्थापन, सहकारी शिक्षक, माजी विद्यार्थी आणि पाचगणी-महाबळेश्वर परिसरातील नागरिकांकडून जाधव सरांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या या पुरस्कारामुळे तालुक्याच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

         -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !