शक्तीप्रदर्शनाने विरोधकांचे धाबे दणाणले
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने आपली ताकद झोकून देण्याचे ठरवले असून, या विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाची ताकद नव्या उंचीवर नेण्यासाठी नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या पुढाकाराने येत्या रविवार, दि. २६ एप्रिल २०२६ रोजी वाई नगरीत 'भव्य नागरी सत्कार' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून अनिल सावंत यांनी शहरासह तालुक्यात भाजपचे मोठे शक्तिप्रदर्शन घडवून आणण्याचे नियोजन केले आहे. या निमित्ताने संपूर्ण तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, हा सोहळा म्हणजे आगामी निवडणुकांसाठी भाजपचे मोठे शक्तिप्रदर्शन मानले जात आहे.
या सोहळ्यात वाई नगरीचे नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, सदस्य तसेच पंचायत समिती सदस्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. स्थानिक नेतृत्वाला बळ देऊन पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक घट्ट करणे, हा या आहे. सोहळ्यामागचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थिती. या दोन वजनदार मंत्र्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून, वाई तालुक्यासाठी मोठ्या निधीच्या घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
हा सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी वाई नगरपालिकेच्या सभागृहात विशेष पूर्वतयारी बैठक पार पडली. यावेळी नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी अत्यंत आक्रमक आणि आश्वासक भूमिका मांडली. ते म्हणाले की, "आगामी काळात भाजपच्या माध्यमातून वाई तालुक्यात विकासकामांना अभूतपूर्व गती दिली जाईल.
सोहळा केवळ सत्कारापुरता विकासाचा पाया ठरेल." त्यांच्या या मर्यादित नसून, तो भविष्यातील भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून, आगामी निवडणुकांसाठी सावंत यांनी एकप्रकारे रणशिंगच फुंकले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
वाई तालुक्याच्या राजकीय इतिहासात हा सोहळा मैलाचा दगड ठरेल आणि विकासाचे नवे पर्व सुरू होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. वाई नगरीत सध्या ठिकठिकाणी लागलेले बॅनर, स्वागत कमानी आणि नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या समर्थकांचा उत्साह पाहता, हा सोहळा ऐतिहासिक ठरणार हे स्पष्ट झाले आहे. लोकनियुक्त प्रतिनिधींचा सन्मान करून समाजातील सर्व घटकांना एकत्र बांधण्याची अनिल सावंत यांची ही रणनीती विरोधकांसाठी चितेचा विषय ठरू शकते. आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष रविवारच्या या ऐतिहासिक सोहळ्याकडे लागले आहे.
बैठकीत तालुकाध्यक्ष दिपक ननावरे, पंचायत समिती सदस्य स्वप्निल गायकवाड, शहराध्यक्ष विजय ढेकाणे, विजयसिंह पिसाळ यांनीही कार्यकर्त्यांना गावपातळीवर जनसंपर्क वाढवण्याचे आवाहन केले. सध्या तालुक्यात बॅनर, पोस्टर आणि स्वागत कमानींमुळे उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, पंचायत समिती सदस्य स्वप्नील गायकवाड, तालुकाध्यक्ष दिपक ननावरे आणि शहराध्यक्ष विजय ढेकाणे यांनी नियोजनबद्ध जनसंपर्क मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखालील या 'टीम भाजप'ने अवघ्या काही दिवसांत संपूर्ण तालुक्यात सोहळ्याचे वातावरण निर्माण केले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




