अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना व ट्युलिप हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पत्रकारितेच्या क्षेत्रात अहोरात्र काम करणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने, अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना (सोलापूर जिल्हा) आणि ट्युलिप सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी २:०० या वेळेत पार पडणार आहे.
या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पत्रकारांसोबतच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील सुविधा उपलब्ध असतील:
शिबिराच्या ठिकाणी शासनाच्या 'आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने' अंतर्गत कार्ड नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणे आणि रेशन कार्ड ऑनलाईन असणे आवश्यक आहे. यासोबतच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि इतर सरकारी योजनांचा लाभही पात्र लाभार्थ्यांना मिळवून दिला जाणार आहे.मोफत औषधे, रुग्ण तपासणी आणि ई.सी.जी. (गरजेनुसार).रक्तातील साखर (Sugar), एच.बी. (Hb), युरिक ॲसिड आणि एच.बी.ए. १ सी. यांसारख्या महत्त्वाच्या चाचण्या मोफत.हाडांची घनता तपासणी (BMD) आणि न्यूरोपॅथी तपासणीची सोय.२डी इको (2D Echo) तपासणीवर ५०% सवलत, तर क्ष-किरण (X-Ray) आणि इतर लॅबोरेटरी तपासणीवर ४०% पर्यंत सवलत दिली जाणार आहे.विशेष म्हणजे, कॅम्पमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या ऑपरेशन फीमध्ये ५०% पर्यंत भरघोस सवलत दिली जाईल.
या शिबिराचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार राजकुमार शहापूरकर असतील. याप्रसंगी अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने, प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण नागणे आणि राज्य तांत्रिक सल्लागार नागेश सुतार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या उपक्रमाचे संयोजन जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, जिल्हाकार्याध्यक्ष तानाजी जाधव, नामदेव लकडे आणि सोहन जैस्वाल यांनी केले असून, शिबिर प्रमुख म्हणून ट्युलिप हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत निकम कामकाज पाहत आहेत.
स्थळ: ट्युलिप हॉस्पिटल, डी-मार्ट रोड, पंढरपूर.वेळ: रविवार, २६ एप्रिल २०२६ (सकाळी ९ ते दुपारी २)जास्तीत जास्त पत्रकार बांधवांनी आपल्या कुटुंबासह या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




