एलसीबीची मोठी कारवाई, दोन पिस्टल आणि कुकरीसह ३.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) शहराच्या गुन्हेगारी जगतात खळबळ उडवून देणारी धडाकेबाज कारवाई केली आहे. जुन्या वैरातून एकाच्या खुनाचा कट रचणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी शस्त्रास्त्रांच्या मोठ्या साठ्यासह अटक केली आहे. या कारवाईमुळे साताऱ्यातील एक संभाव्य रक्तपात टाळण्यात पोलिसांना मोठे यश आले असून, परिसरात एलसीबीच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डबेवाडी परिसरात काही तरुण घातक शस्त्रांसह फिरत असल्याची आणि एका गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने डबेवाडी परिसरात सापळा रचला.
शस्त्रांचा मोठा साठा जप्त
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत करण जोतिराम चव्हाण (वय २१, रा. डबेवाडी, ता. जि. सातारा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत एका विधी संघर्षग्रस्त बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची झडती घेतली
पोलिसांना धक्कादायक वस्तू आढळून आल्या.
२ देशी बनावटीची पिस्टल
५ जिवंत काडतुसे
२ कुकरी आणि १ सुरा
२ मोबाईल हँडसेट व १ मोटारसायकल
असा एकूण ३ लाख २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जुन्या वैरातून रचला होता खुनाचा कट
प्राथमिक तपासात समोर आले आहे की, संशयित आरोपी करण चव्हाण हा जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी एका व्यक्तीच्या खुनाचा कट रचत होता. त्यासाठीच त्याने ही घातक शस्त्रे जमा केली होती. मात्र, तो आपला डाव पूर्ण करण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सपोनि रमेश गर्जे, रोहित फार्णे, पोउनि विश्वास शिंगाडे, परितोष दातिर आणि त्यांच्या विशेष पथकाने केली. या पथकातील सर्व अंमलदारांचे पोलीस अधीक्षकांनी विशेष अभिनंदन केले आहे.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




