मांढरदेव नळ पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी महिला बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे यांच्या सुचना

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ग्रामीण पाणी पुरवठाच्या अभियंत्यांकडून घेतला आढावा

Jal jivan mission, mahila balkalyan, ZP, Rutuja Viraj Shinde, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई तालुक्यातील दुर्गम असलेल्या व पर्यटन क्षेत्र असलेल्या मांढरगडावर उन्हाळ्यात पाण्याचे हाल होत असतात. तेथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार मांढरदेव, येरूळी, गुंढेवाडी, पिराचीवाडी, धावडी, बालेघर या गावांसाठी महत्वाची ठरु पहाणारी योजना लवकरात लवकर कशी मार्गी लागले पाहिजे, अशा सुचना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे यांनी बैठकीत दिल्या. दरम्यान, मांढरदेव परिसरातील गावांना मुबलक पाणी मिळणार आहे. त्यादृष्टीने वाईमध्ये स्थानिक ग्रामस्थांची बैठक घेवून सविस्तर आढावा घेवू, असेही या बैठकीत ठरले.

जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याणच्या सभापती ऋतुजा शिंदे यांच्या केबीनमध्ये गुरुवारी दुपारी जलजीवन योजनेंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना सुरु आहे. त्या योजनेच्या कामाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला युवा नेते विराज शिंदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता यश कोलुचे, ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे उपअभियंता गौरव चक्के आदी मान्यवर उपस्थित होते. अभियंता यश कोलुचे यांनी मांढरदेव नळ पाणी पुरवठा योजना वाई तालुक्यातील मांढरदेव, येरुळी, बालेघर, गुंडेवाडी, पिराचीवाडी, धावडी या गावांसाठी असून एकूण कुटुंबे या योजनेवर 783 आहेत. नळजोडणी 766 कुटुंबांना करण्यात येणार आहे. धोम धरणातून हे पाणी आणले जाणार आहे. दरडोई पाणी 55 लिटर देण्यात येणार आहे. कार्यादेश 29 डिसेंबर 2022 ला दिलेला आहे. योजनेची किमंत ही सुरुवातीला 16 कोटी 46 लाख 34 हजार 502 रुपये होती, अशी योजनेची माहिती त्यांनी दिली. त्यावर सभापती ऋतुजा शिंदे यांनी लोकांना लवकरात लवकर पाणी कसे देता येईल या दृष्टीने काम झाले पाहिजे. येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत. त्याही सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करुन ही योजना लवकरात लवकर मार्गी लावू, त्याकरता वाईमध्ये एक बैठक घेण्यात येईल, असे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना सुचना केल्या. त्याचबरोबर पाण्या टाक्या कशा असणार आहेत, पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा कशी असेल, विद्युत बील वाचवण्यासाटी काय काय उपाययोजना केलेल्या आहेत. तेही जाणून घेत सभापतीं ऋतुजा शिंदे यांनी अभियंत्यांना सुचना केल्या.

मांढरदेव भागातला पाण्याचा टँकर बंद होणार ही योजना लवकर कशी कार्यान्वित करता येईल या दृष्टीने जो अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. त्या दृष्टीने पाईपलाईन चांगल्या क्षमतेची, पाण्याच्या टाक्यांची क्षमता याचीही माहिती घेतली असून ही योजना पूर्ण झाल्यानंतर वाई तालुक्यातील मांढरदेव हा भाग टँकर मुक्त होणार आहे, असेही युवा नेते विराज शिंदे यांनी सांगितले.

अशा असणार पाण्याच्या टाक्या

वेरुळी टाकी 35 हजार लिटर

बालेघर टाकी 44 हजार लिटर

मांढरदेव टाकी 3 लाख 36 हजार लिटर

कोचळेवाडी टाकी 11 हजार लिटर

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !