लोटस इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी ऐश्वर्या ढोले ९८.२ टक्के गुणांसह प्रथम

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन

Student get success, Lotus English medium School,  sveri, pandharpur, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) तर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत पंढरपूर येथील 'श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन' संचलित, लोटस इंग्लिश स्कूलने संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

​विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी ऐश्वर्या ढोले हिने ९८.२ टक्के गुण प्राप्त करून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे तसेच कुमारी शरयू देशमुख आणि कुमारी प्रणिती पवार यांनी प्रत्येकी ९५.६ टक्के गुण मिळवून संयुक्तपणे द्वितीय क्रमांक मिळवला. कुमारी जान्हवी हिलाळ ९१.६ टक्के गुणांसह तृतीय स्थानी राहिली आहे. ​

विषयनिहाय गुणवत्ता आणि विशेष प्राविण्य 

विद्यार्थ्यांनी केवळ एकूण टक्केवारीतच नव्हे, तर वैयक्तिक विषयांतही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. माहिती तंत्रज्ञान (आय टी) या विषयात ऐश्वर्या ढोले हिने आणि मराठी विषयात धनश्री रणदिवे हिने पैकीच्या पैकी अर्थात १०० पैकी १०० गुण मिळवून विशेष प्राविण्य प्राप्त केले. ​शाळेतील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे - ​ऐश्वर्या ढोले: ९८.२ टक्के, ​शरयू देशमुख: ९५.६ टक्के, ​प्रणिती पवार: ९५.६ टक्के, ​जान्हवी हिलाळ ९१.६ टक्के, आदेय अनुसे: ९१ टक्के, ​अश्विनी गरड: ९० टक्के. ​विषयनिहाय सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत- माहिती तंत्रज्ञान १०० पैकी १०० ऐश्वर्या ढोले, मराठी १०० पैकी १०० धनश्री रणदिवे, विज्ञान १०० पैकी ९८ ऐश्वर्या  ढोले, इंग्रजी १०० पैकी ९८ ऐश्वर्या ढोले, हिंदी १०० पैकी ९७ प्रणिती पवार, सामाजिक शास्त्र ९६ ऐश्वर्या ढोले,९६, शरयू देशमुख, गणित ८९ शरयू देशमुख.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे, अध्यक्ष भिमराव रोंगे, उपाध्यक्ष हणमंत बागल, शाळेच्या प्राचार्या डॉ.जयश्री भोसले, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले.​

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !