अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर किसन वीर साखर कारखान्याचे तोडणी वाहतुक करारास प्रारंभ

२०२६-२७ गळित हंगाम पुर्ण क्षमतेने चालविणार - व्हाइस चेअरमन प्रमोद शिंदे

Kisanveer sugar factory, harvesting contract, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे) 

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ या गळित हंगामासाठी कारखान्याकडे नोंदविलेल्या संपुर्ण ऊसाची तोडणी व वाहतुक वेळेत होण्याच्यादृष्टीने साडेतीन मुहर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ऊस तोडणी वाहतुकीच्या कराराचा शुभारंभ कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांच्या हस्ते, ऊस तोडणी वाहतुक संस्थेचे अध्यक्ष बबनराव साबळे, उपाध्यक्ष अजय कदम व संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर करण्यात आला.

सातारा सहकारी शेती औद्योगिक तोडणी व वाहतुक सोसायटीमार्फत कारखाना कार्यस्थळावर प्राथमिक स्वरूपात अविनाश सावंत, गणेश सपकाळ, संग्राम चव्हाण, दिपक जाधवराव, किरण शिंदे श्री. पठाण, बादशाहा इनामदार, अल्पेश बाबर, योगेश शिंगटे, ओंकार मोरे, नाना देवकर, अक्षय पवार, संतोष ढाणे, अधिक ढाणे, अमोल जाधव, केशवराव जाधव, श्री. जायकर, श्री. सुर्यवंशी या ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारांनी आपले करार केले.

व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यावेळी म्हणाले की, किसन वीर कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंद पाटील व सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळाने मागील तीन हंगामामध्ये घेतलेले अथक कष्ट, जनमाणसांत व वाहतुक कंत्राटदारांमध्ये कारखान्याबद्दलचा गेलेला विश्वास पुन्हा मिळविण्यामध्ये यशस्वी झालो. त्याचीच पोहोच पावती म्हणून सन २०२५-२६ च्या हंगामामधील यंत्रणेचे जेवढे करार केलेले होते, त्याप्रमाणे यंत्रणा मिळविण्यात आपण यशस्वी झालो. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही आपला संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यास गाळपास घालून कारखान्याच्या उन्नतीसाठी जे प्रयत्न केले ते अभूतपूर्व होते. काहीही झाले तरी कष्ट करणाऱ्या ऊस उत्पादकाचा एक रूपयाही बुडता कामा नये, या उद्दात्त भावनेतून आमचे संचालक मंडळ काम करीत आहे. स्थानिक वाहतुक कंत्राटदारांनाही आपले करार किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे करण्याचे आवाहनही श्री. शिदे यांनी केलेले असून येणारा गळीत हंगाम आपल्या सर्वाच्या मदतीने व सहकार्याने पुर्ण क्षमतेने व सांधिक प्रयत्नातुन पार पाडणार असल्याचे सांगितले.

यावेळी कारखान्याचे संचालक प्रकाश धुरगुडे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, खंडाळा कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, तोडणी वाहतुक संस्थेचे संचालक मानसिंग साबळे, अरविंद कदम, शशिकांत भोईटे, ॲड. उदयसिंह पिसाळ, मॅनेजर बी. आर. सावंत, शेती अधिकारी विठ्ठलराव कदम, ऊस वाहतुक कंत्राटदार बहुसंख्येने उपस्थित होते.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !