स्वेरीमध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि एमसीएचा पालक मेळावा उत्साहात - करिअरच्या संधींवर मंथन

गेटपरीक्षेतील १८ यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव - पालक आणि शिक्षकांमधील संवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Career guidance camp, teachers guardians meet, sveri, pandharpur, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
गोपाळपूर येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मधील कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (CSE) आणि मास्टर ऑफ कॉम्प्यूटर ॲप्लीकेशन्स (MCA) या दोन्ही विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पालक मेळावा' मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात पालकांनी मोठा सहभाग नोंदवला असून, विद्यार्थी विकास आणि करिअरच्या नव्या संधींबाबत शिक्षक आणि पालकांमध्ये सकारात्मक संवाद झाला.

व्यासपीठावर पालक प्रतिनिधी म्हणून महेश मोटे आणि महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ. अक्काताई साळुंखे उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार यांच्या सहकार्याने उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विभागप्रमुख डॉ. प्राजक्ता सातारकर व प्रा. एम. वाय. शेख यांनी या मेळाव्याचे नेटके नियोजन केले होते.

प्रगत तांत्रिक सुविधांची पालकांना माहिती
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. व्ही. डी. जाधव आणि प्रा. एम. वाय. शेख यांनी विभागातील अद्ययावत प्रयोगशाळा, मशिन्स, इंडस्ट्रीयल व्हिजीट्स आणि स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थ्यांच्या यशाची माहिती दिली. विशेषतः अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या 'गेट' (GATE) परीक्षेचे महत्त्व आणि त्याद्वारे मिळणाऱ्या उच्च करिअरच्या संधींवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला.

'स्वेरी'त गेट परीक्षेची विशेष तयारी: डॉ. बी. पी. रोंगे
प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, "स्वेरीमध्ये विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणे आखली जातात. प्रगत तांत्रिक प्रशिक्षण (Advanced Technical Training) आणि अद्ययावत स्टडी मटेरियलच्या जोरावर आम्ही विद्यार्थ्यांकडून 'गेट' परीक्षेची तयारी करून घेतो. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी मुख्य ग्रंथालयात सर्व सोयी उपलब्ध असून वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या टेस्टमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो."

प्लेसमेंट आणि कौशल्य विकासावर भर
प्लेसमेंट विभागाचे प्रा. ए. ए. मोटे यांनी पालकांना संबोधित करताना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील संधी, इंग्रजी संभाषण कौशल्य, सादरीकरण आणि तांत्रिक प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले. करिअर घडवताना पालकांनी कोणती भूमिका घ्यावी, यावरही त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
वर्ष २०२५-२६ च्या 'गेट' परीक्षेत कॉम्प्यूटर सायन्स विभागातील तब्बल १८ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पालकांनी काही महत्त्वाच्या सूचना मांडल्या, ज्यावर उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शंकांचे निरसन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया शेगदार यांनी केले, तर डॉ. प्राजक्ता सातारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या मेळाव्यास दोन्ही विभागांचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि सुमारे १०० हून अधिक पालक उपस्थित होते.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !