ढोल-ताशांच्या गजरात अन् ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांची शाही एन्ट्री - धावडा येथील मराठी व उर्दू शाळेचा स्तुत्य उपक्रम

जि.प. शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात
ZP school admission, bhokaradan, jalana, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, जालना (प्रतिनिधी मजहर पठाण)
पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचे जंगी स्वागत
शाळेचा पहिला दिवस म्हटला की रडणारी मुले आणि चिंतेत असलेले पालक असे चित्र अनेकदा दिसते. मात्र, भोकरदन तालुक्यातील धावडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी व उर्दू शाळेने याला छेद दिला आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी चक्क सजवलेल्या ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढत आणि ढोल-ताशांच्या गजरात चिमुकल्यांचे स्वागत करून एक 'भव्य दिव्य प्रवेशोत्सव' साजरा करण्यात आला. या शाही एन्ट्रीने संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

फुलांनी सजलेला ट्रॅक्टर अन् लेझीमचा ताल
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची रॅली. या रॅलीसाठी ट्रॅक्टरला फुले आणि रंगीबेरंगी फुग्यांनी अतिशय सुंदररीत्या सजवण्यात आले होते. ढोल-ताशांचा कडकडाट आणि लेझीम पथकाच्या तालावर निघालेल्या या मिरवणुकीमुळे परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. आपल्या पाल्यांचे असे जंगी स्वागत पाहून पालकांच्या चेहऱ्यावरही आनंदाचे कारंजे फुलले होते.

पालक अन् पत्रकारांचा सन्मान
शाळेत प्रवेश केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा आणि या उपक्रमाला प्रसिद्धी देणाऱ्या पत्रकार बांधवांचा शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी आणि त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी, या उद्देशाने त्यांना खाऊ आणि शैक्षणिक भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.

शिक्षक वृदांची मेहनत यशस्वी
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले. उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शाकीर कुरेशी आणि मराठी शाळेचे मुख्याध्यापक भानुदास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नियोजन करण्यात आले होते. या मोहिमेत शिक्षक विठ्ठल इंगळे, लीलाधर सपकाळे, शेख हमीद, शेख सालेहा मॅडम, कंकाळ सर, वेंडोले सर आणि रहिमा मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या सांगतेवेळी उपस्थित सर्व मान्यवर, ग्रामस्थ आणि पालकांचे आभार मुख्याध्यापक भानुदास काळे यांनी मानले. जिल्हा परिषद शाळांच्या या उपक्रमाचे सध्या सर्वत्र कौतुक होत असून, ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा आणि उत्साह उंचावण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !