शब्दांच्या दालनातून सामाजिक वास्तव उमटते, त्यामुळे कविता रसिकांच्या मनाचा ठाव घेते - माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे

मंगळवेढ्यात शब्दसुमने मंचच्या कविसंमेलन आणि गझल मुशायऱ्याला रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद
Gazal mushayra, sachin kulkarni, Lakshman dhobale, mangalwedh, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (प्रतिनिधी राज सारवडे)
शब्दांच्या माध्यमातून मनातील भावना, समाजातील होरपळ आणि वास्तव मांडण्याचे सामर्थ्य साहित्यात असते. जेव्हा अंतरीक ओढीला हक्काचे व्यासपीठ मिळते, तेव्हाच समाजात उत्तम साहित्यिक निर्माण होतात, असे प्रतिपादन माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.
मंगळवेढा येथील नगर वाचनालयात 'शब्दसुमने मंच' तर्फे १५ एप्रिल रोजी गझलसम्राट स्व. सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले कविसंमेलन व गझल मुशायरा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अकबर मुलाणी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि गझलसम्राट स्व. सुरेश भट यांना आदरांजली वाहून करण्यात आली.
नवोदितांसाठी हक्काचे व्यासपीठ - हेमंत रत्नपारखी
प्रास्ताविक करताना शब्दसुमने मंचचे संस्थापक अध्यक्ष श्री. हेमंत रत्नपारखी यांनी मंचच्या प्रवासाचा आढावा घेतला. नवोदित कवी आणि साहित्यिकांना आपली प्रतिभा सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हाच या मंचचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
कवितांनी जिंकली मने,
कविसंमेलनात वैविध्यपूर्ण विषयांवरील कवितांचे सादरीकरण झाले. यामध्ये संपदा सोले, शिवकांता नकाते, रोहिणी शिंदे, मोहन जुंदळे, अशोक उन्हाळे, राणी धणवे, मंगल बनसोड, धनंजय पाटील, धनंजय माळी, लता माळी, वर्षा दिवसे, अनुराधा लवटे, संतोष रायबान, नंदा माने, अमीर पटेल, हरिप्रसाद देवकर व दत्तात्रय जमदाडे या कवींनी आपल्या दर्जेदार कवितांनी रसिकांची मने जिंकली.
गझल मुशायऱ्याचा रंग
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गझल मुशायरा रंगला. सुजीतकुमार कांबळे, सचिन कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, गणेश यादव, हेमंत रत्नपारखी, विद्या माने आणि प्रिया कौलकर यांनी खुमासदार गझला सादर केल्या. विशेषतः सचिन कुलकर्णी यांनी 'शेतकरी' या विषयावर सादर केलेल्या गझलेने उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या आणि संपूर्ण सभागृहातून त्यांना उत्स्फूर्त दाद मिळाली.
या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन गणेश यादव, अशोक उन्हाळे, हरिप्रसाद देवकर आणि विद्या माने यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी हरिप्रसाद देवकर यांनी सर्वांचे आभार मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी नगर वाचनालयाचा कर्मचारी वर्ग आणि रसिक कला मित्र मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला मंगळवेढ्यातील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !