जल जीवन मिशनसह विविध उपाययोजनांवर चर्चा - ग्रामस्थांनी मांडले टंचाईचे प्रश्न

पाणीटंचाईवर प्रशासन सतर्क - मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक 

Drinking water problem, minister makrand Patil, Wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे) 

वाई तालुक्यातील पाणीटंचाई परिस्थिती व प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सोमवार, दि. 13 रोजी पंचायत समिती सभागृहात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी तालुक्यातील गावे व वाडी-वस्त्यांवरील पाणीटंचाई उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

टंचाई कृती आराखड्यानुसार टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यासाठी 8 गावे व 11 वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच 19 खाजगी विहिरी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव असून, काही ठिकाणी विहिरी खोल करणे व गाळ काढण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी 4 गावे व 1 वाडी निश्चित करण्यात आली आहे.

सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेल्या गावांमध्ये मांढरदेव, गुंडेवाडी, बालेघर, आनंदपूर, अनपटवाडी व कासुर्डी वाडी यांचा समावेश आहे. ज्या गावांमध्ये नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी योजनेवर अधिक भर देऊन गोटा पाईप उपलब्ध करून देण्याची मागणी मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे करण्यात आली.

दरम्यान, या आढावा बैठकीसाठी पश्चिम भागातील अनेक गावांतील सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोळेवाडी, कोंढवली व वाशिवली या गावांतील नागरिकांनी पाणीटंचाई संदर्भातील गंभीर प्रश्न उपस्थित केले. यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत योजनांची प्रगती, नवीन विहिरी घेणे, विद्यमान विहिरींची विशेष दुरुस्ती, टँकरने पाणीपुरवठा, खाजगी विहीर अधिग्रहण तसेच विहिरी खोल करणे यांसारख्या मुद्द्यांवर भर देण्यात आला.

ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेत मंत्री मकरंद पाटील यांनी संबंधित प्रशासनाला तात्काळ उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले. गावागावातील पाणीटंचाईचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावून नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

या बैठकीस  प्रांत अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सोनाली मिटकरी, पंचायत समिती सभापती विक्रांत डोंगरे, वाई नगराध्यक्ष अनिल सावंत तसेच विविध विभागांचे शासकीय अधिकारी, पंचायत समिती सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, , सरपंच,ग्रामस्थ व इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !