भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित समाज बांधवांमध्ये स्वाभिमान जागविला - श्रीरंग काटेकर

गौरीशंकर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी 

Dr Babasaheb Ambedkar jayanti, education, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित समाज बांधवांमध्ये शिका आणि संघटित व्हा व संघर्ष करा हा महामंत्र देऊन या समाज बांधवांमध्ये खऱ्या अर्थाने स्वाभिमान जागविला असे मत गौरीशंकर चे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले ते लिंब जि. सातारा येथील गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष बेल्हेकर डॉ. भूषण पवार डॉ. धैर्यशील घाडगे डॉ. माधुरी मोहिते प्रा. सायली दळवी प्रा. गौरी इथापे ग्रंथपाल विजय निकम आदि प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी आयोजित केलेल्या विविध स्पर्धेमधील विजेता विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक ग्रंथपाल विजय निकम यांनी केले. आभार प्रा. सायली दळवी यांनी मानले.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !