साताऱ्यात उत्साहात पार पडली समता दिंडी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नागरिकांनी नोंदवला उत्स्फूर्त सहभाग

Dr. Babasaheb Ambedkar jayanti, samata dindi, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सातारा शहरात भव्य 'समता दिंडी' मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या या दिंडीत विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या समता दिंडीची सुरुवात श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथून करण्यात आली. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा   डॉ. प्रिया शिंदे यांच्या हस्ते दिंडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जात पडताळणी समितीचे अध्यक्ष जीवन गलांडे, प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार समीर यादव, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त  सुनिल जाधव, जात पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश घुले, समाज कल्याण अधिकारी श्रुती रकटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 प्रतापसिंह हायस्कूल येथून निघालेली ही दिंडी राजपथावरून मार्गस्थ झाली. दिंडीचा समारोप सातारा नगर पालिका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यापाशी झाला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि समतेचा संदेश देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

या दिंडीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी  ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांच्या जयघोषात सहभाग घेतला, ज्यामुळे संपूर्ण सातारा शहर आंबेडकरमय झाले.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !