कर्मचाऱ्यांच्या बैठकीत कामकाजाचा आढावा
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर (प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी)
वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी तसेच उपकेंद्र निमगाव, जानेफळ व खंडाळा येथील प्रमुख कर्मचाऱ्यांचे बैठक घेतली त्या बैठकीमध्ये त्यांचे सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला आणि जास्तीत जास्त ग्रामीण भागातील रुग्णांचे सेवा देण्याच्या सूचना करण्यात आल्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व स्टाफ व एमबीबीएस डॉक्टर असताना सर्वसामान्य लोकांना खाजगी दवाखान्यामध्ये जाऊन आपल्याला उपचार करून घ्यावे लागतात यापुढे ते ते प्रमाण कमी होऊन जास्तीत जास्त रुग्ण सरकारी दवाखान्यांमध्ये येतील याची काळजी डॉक्टर आणि सर्व स्टाफने घ्यावे तसेच सकाळी साडेनऊ ते एक वाजेपर्यंत व दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत उपयोगी सुरू असली पाहिजे त्यामध्ये शिऊर, खंडाळा,जानेफळ आणि निमगाव येथील ओपीडी सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी व उपकेंद्रासाठी ज्या काही सुविधा लागतील जे काही औषधेचा तुटवडा असेल तो वेळीच मला कळविण्यात यावा म्हणजे त्यावर तात्काळ उपाय करून सर्व ठिकाणी औषध पुरवठा व रुग्णांना सुविधा देता येईल याप्रसंगी उपसभापती सोनालीताई जाधव, बबन तात्या जाधव, चंद्रशेखर खांडगौरे, सुशील देशमुख, दादाभाऊ सूर्यवंशी, कृष्णा जाधव, राजेंद्र जाधव, पत्रकार संजय पगारे इत्यादी कार्यकर्ते हजर होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




