भुईंज पोलीस ठाणे कडून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट स्वरांवर कारवाई

वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई

Action on bullet vowels, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

भुईज पोलीस ठाणे हद्दीत काही वाहनचालकांकडून बुलेट मोटारसायकलींना कंपनीचा मूळ सायलेन्सर काढून त्याऐवजी मोठ्या आवाजाचे (इंदोर/पंजाब प्रकारचे) सायलेन्सर बसवून गावामध्ये फिरत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

सदर तक्रारींची दखल घेऊन भुईज पोलीस ठाण्याकडून विशेष मोहिम राबविण्यात आली. त्यानुसार एकूण 11 बुलेट मोटारसायकली ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आल्या. संबंधित वाहनांवर बसवलेले कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर काढून त्याठिकाणी कंपनीचे मूळ सायलेन्सर बसविण्यात आले.

तसेच संबंधित वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करून एकूण रु. 14,500/- दंड आकारण्यात आला आहे.

ही कारवाई भुईज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक  पतंगराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक  सुरज शिंदे तसेच वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार पो. ना. सुशांत धुमाळ, पो. काँ. रोहन चव्हाण आणि पो. काँ. अजित पवार यांनी केली.

भुईज पोलीस ठाण्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे बेकायदेशीर सायलेन्सर लावून ध्वनीप्रदूषण करणारी बुलेट मोटारसायकल आढळल्यास तात्काळ भुईज पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल.

        -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !