जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शितल पिसाळ यांनी कष्टाने मिळवले यश

शिवकृपा सहकारी पतपेढी वतीने गौरव

Successful Entrepreneur Award, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी  शुभम कोदे )

आपल्या मेहनतीच्या जोरावर, शून्यातून विश्व निर्माण करत राज्य शासनाचा 'यशस्वी उद्योजक' पुरस्कार पटकावणाऱ्या ओझर्डे (ता. वाई) येथील सुकन्या व 'भक्ती वुलन हाऊस'च्या संचालिका श्रीमती शितल पिसाळ यांचा जागतिक महिला दिनानिमित्त शिवकृपा सहकारी पतपेढी (लि. मुंबई), वाई शाखेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

     शितल पिसाळ यांचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. १७ वर्षांपूर्वी ओझर्डे सारख्या छोट्या गावात केवळ एका 'हँड मशीन'च्या साहाय्याने त्यांनी स्वेटर विणकाम व्यवसायाला सुरुवात केली होती. सासर ओझर्डे आणि माहेर मल्हारपेठ (ता. पाटण) असलेल्या शितल यांनी ग्राहकांची वाढती पसंती पाहून व्यवसायाचा विस्तार केला. आज वाई शहरात अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या जोरावर त्यांनी 'भक्ती वुलन हाऊस'च्या माध्यमातून आपला ब्रँड संपूर्ण राज्यात पोहोचवला आहे.

     राज्याच्या खादी ग्रामोद्योग महामंडळाने त्यांच्या कामाची दखल घेऊन शिफारस केल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १ लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन त्यांना 'यशस्वी उद्योजक' पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय राज्य शासनाचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते यशस्वी महिला उद्योजक सन्मान तसेच विद्यानिकेतन संस्थेचा राज्यस्तरीय महिला उद्योजक समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

     संस्थापक अध्यक्ष गोरख चव्हाण व उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली ४३ वर्षांपूर्वी एका मंदिरातून संकल्प केलेल्या या पतपेढीचा वटवृक्ष आज १०२ शाखांमध्ये विस्तारला आहे. महिला दिनानिमित्त एकाच वेळी सर्व शाखांमध्ये महिलांचा सन्मान करण्याची परंपरा संस्थेने जपली आहे. राजकीय पाठबळ नसताना केवळ कौशल्याच्या जोरावर शितल पिसाळ यांनी मिळवलेले यश इतर महिलांसाठी दीपस्तंभ आहे.

     वाई शाखेतील हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाखा व्यवस्थापक मनोज पवार, सहाय्यक शाखाधिकारी अंकुश पोळ, विनोद जांभळे, मयुर चोरट, आकाश पवार, प्राजक्ता पवार, नचिकेत राऊत व सामाजिक कार्यकर्ते हणमंत ढवळे यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी विविध क्षेत्रांतील महिला अधिकारी, उद्योजक व सामाजिक कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

        -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !