भोकरदन तालुक्यातील नळणी खुर्द येथील नवरदेवाची फसवणूक

नकली आधार कार्ड वर लग्न लावून ; चार लाख रुपयाला गंडवले

Deception of the bridegroom, Jalna, bhokardan, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,भोकरदन (प्रतिनिधी मजहर पठाण)

सविस्तर वृत्त असे की, भोकरदन तालुक्यातील नळणी खुर्द येथील नवरदेवाला बनावट नवरीच्या माध्यमातून, लग्न लावून देत तब्बल चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार भोकरदन तालुक्यात उघडकीस आला आहे, 

बनावट आधार कार्ड तयार करून नवरीचे नाव बदलून लग्न लावण्यात आल्याचे समोर आले आहे पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे, 

कृष्णा नामदेव देठे वय 23 राहणार नळी खुर्द तालुका भोकरदन यांची फसवणूक झाली असून त्यांनी भोकरदन ठाण्यात फिर्याद दिली आहे 21 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील प्रियांका मनोज संन्याशी या मुलीबरोबर नळणी खुर्द येथे देठे यांचे लग्न लावून देण्यात आले हे लग्न लावून देण्यासाठी दीपक सिमोन शेळके दांडगे मावशी कल्याणराव घाडगे आणि संतोष मोरे यांनी मध्यस्थी केली होती, लग्न जमवून देण्याच्या मोबदल्यात या मध्यस्थांनी चार लाख रुपये रोख रक्कम घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे, 

तसेच लग्नाच्या वेळी नवरीसाठी भोकरदन येथील ज्वेलर्स कडून पन्नास हजार रुपयांचे सोन्याचे दागिने ही खरेदी करण्यात आले होते, लग्नानंतर सुमारे पंधरा दिवस सर्व काही सुरळीत होते मात्र त्यानंतर संशय आल्याने फिर्यादीने पत्नीला आधार केंद्रावर गेले असता धक्कादायक बाब उघडकीस आली, लग्नावेळी सांगितलेले नाव प्रियंका मनोज संन्याशी नसून तिचे खरे नाव प्रियंका दीपक शेळके असल्याचे आधार कार्ड स्पष्ट झाले, 

तसेच लग्नासाठी दिलेले आधार कार्ड बनवत असल्याचेही समोर आले दरम्यान 11 मार्च रोजी सायंकाळी आरोपी दीपक शेळके व त्यांच्यासोबत दोन पुरुष व एक महिला फिरतीच्या घरी आले त्यांनी नवरी सोबत नेण्याचा प्रयत्न करीत तिच्या मांडीवर चटके दिल्याचा आरोप केला, 

तसेच नवरीला आमच्या ताब्यात द्या अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करू अशी धमकीही दिली यात पोलिसांनी दीपक सिमोन शेळके व नवरी प्रियांका दीपक शेळके यांना अटक केली त्यांना भोकरदन येथील दिवाणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 17 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली, 

बनावट ओळखपत्र तयार करून लग्न लावून देत फसवणूक करणाऱ्या, डोळ्यांवर पोलीस लक्ष देऊन आहेत या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे पैसे देऊन किंवा मध्यस्थ त्यांच्या माध्यमातून घाईघाईने लग्न करण्याच्या व्यवहारांना नागरिकांनी बळी पडू नये तसेच ओळखीची खातर जमा झाल्याशिवाय कोणत्याही अनोळखी विश्वास करू नये, 

असे आव्हान सागर शिंदे पोलीस उपनिरीक्षक भोकरदन यांनी केले आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !