श्री कुलस्वामी को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा ४२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

विशेष कार्यक्रमाचे आयोजन

Anniversary of Shri Kulaswami Co-op. Credit Society, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

श्री कुलस्वामी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., नवी मुंबई यांचा ४२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संस्थेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी व्यवस्थापक नितीन बेलोशे, सहाय्यक अधिकारी लक्ष्मी मालुसरे, सिनियर क्लार्क विशाल गायकवाड, सिनियर क्लार्क प्रतीक्षा कांबळे तसेच पूजा सणस यांनी पुढाकार घेतला.

कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर करण्यात आला. सध्या संस्थेची सभासद संख्या 121901 इतकी असून सभासद ठेव 12200 कोटी रुपये माहिती देण्यात आली. या प्रसंगी संस्थेच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या सभासद, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत वर्धापन दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला.श्री कुलस्वामी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., नवी मुंबई यांच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवर. यावेळी शाखा सल्लागार  तुकाराम शेठ जेधे  विकास जाधव, यशवंत खैरे, शिवाजी जमदाडे, अमोल बांदल, राजाराम शिंदे, गणेश सणस, गणेश जरांडे, प्राजक्ता कदम, दिपाली जाधव, तुषार भोसले, रमेश पवार, विजय भोसले आदी उपस्थित होते.

      -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !