विशाल भोईटे या युवकाने प्रामाणिकपणे रस्त्यावर पडलेले चाळीस हजार रुपये ज्याचे पडलेत त्याचा शोध घेऊन त्याचे त्याला परत केले

युवा पिढीने विशाल भोईटे यांचा आदर्श घ्यावा 

Lost money back, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

रस्त्यावर पडलेले चाळीस हजार रुपये ज्याचे पडलेत त्याचा योग्य पद्धतीने शोध घेत त्याचे त्याला परत करीत विशाल भोईटे या युवकाने प्रामाणिकपणे चांगले काम केले असून युवा पिढीने विशाल भोईटे यांचा आदर्श घेणे गरजेचे असल्याचे  प्रतिपादन वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांनी केले आहे.

   याबाबतची सविस्तर माहिती अशी की ओमकार नंदकुमार बोबडे रा. अनपटवाडी ता. कोरेगाव जि. सातारा हे अनपटवाडी येथून वाघोली येथील बँकेत जात असताना वाघोली येथे मोटरसायकल वरून त्यांच्या खिशातील पाचशे रुपयांच्या नोटा असणारे चाळीस हजार रुपये असलेले  बंडल रोडवर पडले व ते तसेच पिंपोडे कडे गेले त्यानंतर वाघोली येथील विशाल शिवाजी भोईटे हे आपल्या भाच्याला शाळेत सोडायला जात असताना त्यांना ते पैसे रस्त्यावर सापडले त्यांनी तात्काळ चौकशी केली मात्र त्यांना हे पैसे कोणाचे आहेत हे कळाले नाही मात्र त्यांनी समोरच असलेल्या वैष्णवी हॉटेल मधील सीसी फुटेज मध्ये हे पैसे कोणाचे पडले आहेत हे बघून घेतले व ते तिथेच थांबले ज्यावेळी ओमकार बोबडे तिथून जात असताना त्यांना थांबवले व विचारणा केली असता ते पैसे त्यांचेच असल्याचे समजले व सीसी फुटेज मध्ये सुद्धा ओमकार बोबडे यांची पैसे पडलेले दिसले त्यानंतर विशाल भोईटे व त्यांचे तपास करणारे सर्व मित्र हे वाठार पोलीस स्टेशन येथे गेले व घडलेला संबंधित प्रकार स.पो.नी. सुशील भोसले व त्यांचे सहकारी एएसआय जितेंद्र शिंदे, आनंदराव भोसले यांना सांगितले व चौकशी व खात्री करून त्यांनी ओमकार बोबडे यांना त्यांचे पैसे परत दिले. 

      यावेळी विशाल भोईटे यांनी दाखवलेला मनाचा मोठेपणा आणि त्यांच्या प्रामाणिकपणा याबद्दल वाठार पोलीस स्टेशनचे स.पो.नि. सुशिल भोसले यांनी त्यांचा पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन विशाल भोईटे यांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजीराव भोईटे, पंकज भोईटे, शंभूराज भोईटे, सुधीर भोईटे, विकास भोईटे, व वाघोली चे ग्रामस्थ उपस्थित होते.

वाघोली ता. कोरेगाव चे विशाल भोईटे हे वाघोली तंटामुक्ती चे अध्यक्ष शिवाजीराव भोईटे यांचे चिरंजीव असून त्यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा अगदी वडिलांच्या कामासारखाच आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत चालवलेली कारकीर्द आदर्शवत असल्याचेही यावेळी सपोनि सुशील भोसले यांनी बोलून दाखवली त्यावेळी उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !