अजामेळा दिंडी क्रमांक २६ च्या वतीने श्री क्षेत्र पंढरी येथील पांडुरंग मंदिरात संपन्न झाला अखंड हरिनाम सप्ताह

त्या सप्ताहाची दहीहंडी  फोडून सांगता 

Akhand Harinam week‌, Solapur, Pandharpur, Shivashahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर प्रतिनिधी

श्री क्षेत्र पंढरपूर येथे अष्टकोटी ब्रम्हांडनायक भगवान पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरात माऊलीच्या पायी वारी सोहळ्यातील अजामेळा दिंडी क्रमांक २६ च्या वतीने घेण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता गुरुवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी ह भ प मधुकर महाराज गायकवाड यांच्या हस्ते  दहीहंडी फोडून या  सप्ताहाची  सांगता झाली

श्री क्षेत्र पंढरी येथे पांडुरंग परमात्म्याच्या राउळात वैकुंठवासी निवृत्ती महाराज गायकवाड व वैकुंठवासी सुभद्रा बाई निवृत्ती महाराज गायकवाड प्रणीत ह भ पत्रकार श्री मधुकर महाराज गायकवाड यांनी सुरू केलेल्या अखंड सप्ताहाची अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता गुरुवारी झाली गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या सप्ताहात प्राचार्य डॉ . पांडुरंग गायकवाड (मंचर) सौ संजीवनी गायकवाड / मंडलिक लांडेवाडी (ता. आंबेगाव ) रवींद्र महाराज कांबळे (रामटेकडी ) दीपक महाराज टेंभेकर (अवसरी खुर्द )प्रा पंढरीनाथ महाराज तांबे (अवसरी खुर्द )ह भ प नंदकिशोर महाराज लोंढे (पुणे ) यांची प्रवचन रुपी सेवा संपन्न झाली या सप्ताहात ह भ प बाळासाहेब महाराज साळवे ( मलठण  )दत्तात्रय महाराज 

रूका री (कोलारवाडी ता आंबेगाव )ह भ प नामदेव महाराज वाळके वेळेश्वर संस्थान (कुरवंडी ता . आंबेगाव ) गणेश महाराज ढगे (पंढरपूर )आदिनाथ महाराज जुन्नरकर (खडकी पिंपळगाव ) भीमाताई ज्ञानदेव लोंढे संगीत अलंकार (वारू )यांची कीर्तन रुपी सेवा संपन्न झाली या सप्ताहाची सांगता पत्रकार हरिभक्त परायण श्री मधुकर महाराज गायकवाड यांच्या हस्ते दहीहंडी फोडून करण्यात आली यावेळी बोलताना मधुकर महाराज गायकवाड महाराज म्हणाले जग एकविसाव्या शतकाकडे जात आहे मनुष्य आपल्या जीवनात समाधानी नाही परमार्थाची व प्रपंचाची सांगड परमार्थात घातल्यास  जीवन जगणे होईल वेळा दिंडीने केलेला सप्ताह परंपरा आणि प्रत्येकाच्या आठवणीत राहील  भाविकांनी याही पुढे अशीच या सप्ताह ला साथ करावी असेही आवाहन मधुकर महाराज गायकवाड यांनी यावेळी केलेयावर्षी या सप्ताहाची तिसावे वर्ष होते . 

सप्ताहाचे संयोजक पत्रकार श्री हरिभक्त परायण मधुकर महाराज गायकवाड व सौ सविता मधुकर महाराज गायकवाड यांनी संयोजन केलेल्या सप्ताहाची सांगता भाविकांच्या उपस्थितीत होऊन भाविकांनी संयोजकांचे कौतुक केले या सप्ताहात ह भ प अर्जुन महाराज पंचरास ह भ प मुरलीधर महाराज शिंदे ह भ प श्रीकांत महाराज बेल्हेकर ह भ प माधव काका शेंडगे ह भ प बबनराव राजगुरू ह भ प कौसाबाई नागू टाव्हरे वरे ह भ प संजीवनी ताई मंडलिक / गायकवाड ह भ प वंदनाताई चव्हाण ह भ प सविता मधुकर गायकवाड लक्ष्मी वहिनी शिंदे ह भ प गणेश महाराज ढगे ह भ प मधुकर महाराज साळवे (रामटेकडी पुणे ) (चोपदार )यांनी कीर्तनाला साथ करून अतिशय सुंदर असे वातावरण निर्माण केले त्याचप्रमाणे या सप्ताहात वैकुंठवासी निवृत्ती महाराज गायकवाड यांचे नातू व प्राचार्य पांडुरंग जी गायकवाड यांचे चिरंजीव श्री प्रतीक पांडुरंग गायकवाड या सप्ताहात वैकुंठवासी ह भ प निवृत्ती  निवृत्ती महाराज गायकवाड यांचे नातू व प्राचार्य डॉ . पांडुरंग महाराज गायकवाड यांचे चिरंजीव श्री डॉ प्रतीक पांडुरंग गायकवाड यांनी वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून मोफत गोळ्या औषधे  वारकऱ्यांना दिली या सप्ताहची सांगता दहीहंडी फोडून मधुकर महाराज यांचे हस्ते सांगता करण्यात आली

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !